वाशिम जिल्ह्यात पावसाचा मुक्काम वाढला
By Admin | Updated: July 22, 2014 22:05 IST2014-07-22T22:05:09+5:302014-07-22T22:05:09+5:30
दुसर्या दिवशीही पाऊस सुरूच

वाशिम जिल्ह्यात पावसाचा मुक्काम वाढला
वाशिम : जिल्ह्यात सोमवारी मध्यरात्री सुरू झालेला पाऊस सलग दुसर्या दिवशीही (दि. २२ जुलै) सुरूच होता. कधी रिमझिम तर कधी रिपरिप कोसळणार्या सरींमुळे शेतकर्यांच्या चेहर्यावर हास्य खुलत होते. दरम्यान जिल्हाभरात जूनच्या सुरूवातीपासून तर २१ जुलैपर्यत केवळ ७९३.७0 मिलीमिटर पाऊस झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत हा निम्म्यापेक्षाही कमी असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.
यंदा मृग नक्षत्रापासूनच पावसाने दडी मारली होती. परिणामी शेतकरी कमालीचे हवालदिल झाले होते. या आठवड्यात जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली.
यंदाच्या पावसाळ्यातील सर्वात अधिक पाऊस २२ जुलैला झाला. २१ जुलैच्या रात्रीपासूनच पावसाला सुरूवात झाली होती. २२ जुलैला दिवसभर पाऊस सुरूच होता. या पावसामुळे वाशिम शहरातील नाले यंदा पहिल्यांदाच वाहल ेयंदा सर्वात कमी पाऊस झालेल्या मानोरा तालुक्यातही गत २४ तासात ५.१0 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान दोन तिन दिवसात जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जिल्हा प्रशासनानेही याला दुजोरा दिला आहे.
** जिल्ह्यात अतवृष्ट्रीचा इशारा
आगामी २४ तासात जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेने व्यक्त केली आहे. स्थानिक नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापण कक्षाला २२ जुलैला दुपारीच एक पत्र पाठवून आपत्तीशी मुकाबला करण्यासाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापण अधिकारी बाळासाहेब बोराडे यांनी आपल्या यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सुचना केल्या असल्याचे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगीतले.
** रखडलेल्या पेरण्या घेतील गती
यंदा मृग नक्षत्रापासूनच पाऊस नसल्यामुळे शेतकर्यांच्या पेरण्या रखडलेल्या होत्या. दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू झाल्यामुळे रखडलेल्या पेरण्या पाऊस उघडताच गती घेणार आहेत. शेतकर्यांनी पेरण्यांची तयारी पूर्ण केली आहे.