पावसाची हजेरी; वातावरणात गारवा
By Admin | Updated: August 23, 2016 23:35 IST2016-08-23T23:35:58+5:302016-08-23T23:35:58+5:30
वाशिम शहरासह ग्रामीण भागात पावसाची हजेरी.

पावसाची हजेरी; वातावरणात गारवा
वाशिम, दि. २३: सुमारे १0 दिवसाच्या उघडिपनंतर मंगळवार, २३ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास वाशिम शहरासह काही ग्रामीण भागात पावसाने हजेरी लावली. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला.
यंदाच्या हंगामात जोरदार स्वरूपात झालेल्या पावसामुळे खरिपातील पेरण्या वेळेत उरकल्या. पिकांची स्थिती देखील उत्तम राहिली. मात्र, मध्यंतरी पावसाने मोठा खंड दिल्यामुळे अधिकांश ठिकाणची पिके धोक्यात सापडली होती. ही बाब लक्षात घेवून अनेक शेतकर्यांनी स्प्रिंकलरव्दारे पाणी देवून पिके वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न चालविला. अशातच मंगळवारी सायंकाळी वाशिम शहर व तालुक्यात काही प्रमाणात पाऊस झाल्याने पिकांना संजीवणी मिळाली.