वाशिम जिल्ह्यात १.११ लाख हेक्टरवर रब्बी पिकाचे नियोजन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 12:31 PM2020-09-28T12:31:49+5:302020-09-28T12:31:59+5:30

आॅफलाईन पद्धतीने खत विक्री झाल्यास संबंधित कृषी सेवा केंद्राविरूद्ध कारवाईचा इशाराही कृषी विभागाने दिला.

Rabi crop planned on 1.11 lakh hectare in Washim district! | वाशिम जिल्ह्यात १.११ लाख हेक्टरवर रब्बी पिकाचे नियोजन !

वाशिम जिल्ह्यात १.११ लाख हेक्टरवर रब्बी पिकाचे नियोजन !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : रब्बी हंगाम तोंडावर आला असून, कृषी विभागाने १.११ लाख हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज वर्तविला आहे. दरम्यान बियाणे, खतांची टंचाई भासू नये म्हणून पुरेशा प्रमाणात साठाही उपलब्ध करण्यात येत आहे. आॅफलाईन पद्धतीने खत विक्री झाल्यास संबंधित कृषी सेवा केंद्राविरूद्ध कारवाईचा इशाराही कृषी विभागाने दिला.
खरीप हंगामात निसर्गाच्या लहरीपणामुळे हतबल झालेले शेतकऱ्यांची सर्व भीस्त आता रब्बी हंगामातील पिकांवर आहे. दुसरीकडे सिंचनाची सुविधा असणाºया शेतकऱ्यांसमोर अनियमित वीजपुरवठा, नादुरूस्त विद्युत रोहित्रामुळे नवीन संकट उभे ठाकण्याची भीती शेतकºयांमधून वर्तविण्यात येत आहे. खरीप हंगामात निसर्गाने यावर्षीही दगा दिल्याने जिल्ह्यातील शेतकरी पुरता खचून गेला आहे. शेतमालाच्या उत्पन्नात प्रचंड घट येत असल्याने लागवडी खर्चही वसूल होत नसल्याची परिस्थिती जिल्ह्यातील अनेक शेतकºयांवर ओढवली आहे. आता शेतकºयांची सर्व भिस्त रब्बी पिकावर आहे. कृषी विभागाच्या नियोजनानुसार, रब्बी हंगामात एक लाख ११ हजार ९०० हेक्टर क्षेत्रफळावर गहू, हरभरा, रब्बी ज्वारी, मका, सुर्यफुल आदी पिकांची पेरणी होण्याचा अंदाज आहे. सर्वाधिक क्षेत्रफळावर अर्थात ७० हजार हेक्टरवर हरभºयाची पेरणी होण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.
त्याखालोखाल गहू, रब्बी ज्वारी, करडई, मका आदींचा पेरा राहिल. रासायनिक खतांची टंचाई भासू नये म्हणून जिल्ह्यासाठी ४३ हजार ९५० मे.टन खत मंजूर झाले आहे.
यावर्षी जास्त पाऊस झाल्याने रब्बी हंगामात सिंचन होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सिंचनात व्यत्यय नको म्हणून महावितरणने आतापासूनच नादुरूस्त विद्युत रोहित्र बदलून देणे, वीजपुरवठा सलग राहिल याची दक्षता घेणे आवश्यक ठरत आहे.

आॅनलाईन पद्धतीने खत विक्री करावी - बंडगर
शेतकºयांची कोणत्याही प्रकारे गैरसोय, फसवणूक होऊ नये म्हणून कृषी सेवा केंद्र संचालकांनी रासायनिक खताची विक्री ही ई-पॉस मशिनवरून करावी. आॅफलाईन पद्धतीने खताची विक्री होणार नाही, याची दक्षता घ्यावी. आॅफलाईन पद्धतीने खताची विक्री केल्यास संबंधितांविरूद्ध योग्य ती कारवाई करण्याचा इशारा जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी व्ही.एस. बंडगर यांनी दिला.

रब्बी हंगामाचे नियोजन करण्यात आले असून १.११ लाख हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज आहे.खते व बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध होणार असल्याने शेतकºयांची गैरसोय टळेल.
- व्ही.एस. बंडगर
कृषी विकास अधिकारी वाशिम

Web Title: Rabi crop planned on 1.11 lakh hectare in Washim district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.