लेखनीतून वंचितांचे प्रश्न मांडले जावेत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:24 IST2021-02-05T09:24:12+5:302021-02-05T09:24:12+5:30
स्थानिक श्री रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालयाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा ऑनलाईन पद्धतीने साजरा करण्यात आला. ...

लेखनीतून वंचितांचे प्रश्न मांडले जावेत!
स्थानिक श्री रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालयाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा ऑनलाईन पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी ‘लेखन- अभिव्यक्तीचे सशक्त माध्यम’, या विषयावर प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. जयश्री देशमुख होत्या. उपप्राचार्य प्रा. किशोर वाहाणे, मराठी विभागप्रमुख प्रा. गजानन बारड यांची प्रमुख उपस्थिती होती.
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत सातारा येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात शिकत असलेल्या ज्योती साळुंखे या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक प्राप्त केला. दिग्रस येथील बा. बू. कला महाविद्यालयाच्या कोमल मदनकार हिने द्वितीय; तर श्री. रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालयाची मोनिका इंगळे आणि गुलाम नबी आझाद समाजकार्य महाविद्यालय, पुसद येथील केतकी अलोने यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. रोख रक्कम, प्रमाणपत्र व ग्रंथभेट असे पारितोषिकांचे स्वरूप होते. या स्पर्धेचे परीक्षण डॉ. विजय जाधव व प्रा. गजानन बारड यांनी केले.