नळांना मीटरचा प्रश्न अधांतरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:16 IST2021-02-06T05:16:53+5:302021-02-06T05:16:53+5:30

---------- वाशिम शहरातील माहूरवेसची पडझड वाशिम : शहराच्या दृष्टीने ऐतिहासिक महत्त्व असलेली माहूरवेस क्षतिग्रस्त झाली आहे. पुरातत्व विभागाने दुरुस्ती ...

The question of meters to pipes is unanswered | नळांना मीटरचा प्रश्न अधांतरी

नळांना मीटरचा प्रश्न अधांतरी

----------

वाशिम शहरातील माहूरवेसची पडझड

वाशिम : शहराच्या दृष्टीने ऐतिहासिक महत्त्व असलेली माहूरवेस क्षतिग्रस्त झाली आहे. पुरातत्व विभागाने दुरुस्ती करून संवर्धन करण्याची मागणी केली जात आहे.

----------

रेतीघाटाचा लिलाव करण्याची मागणी

धनज : रेतीघाटाचा लिलाव झाला नाही. शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाला आहे. सध्या वाळूचोरीला चांगलेच उधाण आले असल्याने लिलाव करण्याची मागणी जाेर धरत आहे.

-------

रोहित्र नादुरुस्त होण्याच्या प्रकारात वाढ

शेलुबाजार : सध्या रबी हंगामातील पिकांच्या सिंचनाची प्रक्रिया सुरू आहे. शेतकऱ्यांनी मोटारपंपांच्या स्टार्टरला ऑटो स्विच लावल्याने एकाचवेळी माेटारपंप सुरू हाेत असल्याने राेहित्र नादुरुस्त होत आहेत.

-------

मुख्य चौकांमधील वाहतूक प्रभावित

वाशिम : शहरातील मुख्य चौकांमधील वाहतूक दिवसभरातून अनेकवेळा प्रभावित होत आहे. आठवडी बाजाराच्या दिवशी हा प्रश्न अधिकच गंभीर होत आहे.

Web Title: The question of meters to pipes is unanswered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.