शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
3
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
4
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
5
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्तूत्तर...
6
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
7
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
8
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
9
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
10
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
11
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

‘एकबुर्जी’ची उंची वाढविण्याचा प्रश्न रखडला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 7:45 PM

शहराची तहान भागविण्यासाठी तसेच शेतक-यांना सिंचनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी एकबुर्जी प्रकल्पाची उंची वाढविण्याचा प्रस्ताव शासनदरबारी पाठविण्यात आलेला आहे. . मात्र, तांत्रिक बाबी समोर करून एकबुर्जीची उंची वाढविण्याचा प्रस्ताव लालफितशाहीत गुंडाळून ठेवण्यात आला आहे. 

ठळक मुद्देप्रस्ताव मंजुरीची प्रतीक्षालोकप्रतिनिधींचा पाठपुरावा ठरला अपयशी

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शहराची तहान भागविण्यासाठी तसेच शेतक-यांना सिंचनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी एकबुर्जी प्रकल्पाची उंची वाढविण्याचा प्रस्ताव शासनदरबारी पाठविण्यात आलेला आहे. याबाबत विद्यमान आमदार लखन मलिक यांनी सलग पाठपुरावा देखील केला. मात्र, तांत्रिक बाबी समोर करून एकबुर्जीची उंची वाढविण्याचा प्रस्ताव लालफितशाहीत गुंडाळून ठेवण्यात आला आहे. तत्कालिन नगराध्यक्ष स्व. रामचंद्र राठी यांच्या कार्यकाळात एकबुर्जी प्रकल्प उभारण्यात आला. तत्कालीन मुख्यमंत्री स्व. शंकरराव चव्हाण यांनी यासाठी निधी मंजुर केला होता. तेव्हापासून आजतागायत या प्रकल्पातूनच वाशिम शहराला पाणीपुरवठा सुरू असून नजिकच्या अनेक खेड्यांमधील शेतक-यांना सिंचनासाठी पाणी पुरविले जात आहे. दरम्यान, गेल्या काही वर्षांत वाशिम शहराचा झपाट्याने विस्तार होण्यासोबतच सिंचनाची गरजही वाढली आहे. त्यातुलनेत मात्र पाणीपुरवठा करण्याकामी एकबुर्जी प्रकल्प कुचकामी ठरत असल्याने प्रकल्पाची उंची वाढविणे गरजेचे ठरत आहेत. याकडे शासनाने विशेष लक्ष पुरवून हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी जोर धरत आहे. 

टॅग्स :DamधरणWaterपाणी