बॅरेज निर्मितीचा प्रश्न लालफितशाहीत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:41 IST2021-05-26T04:41:10+5:302021-05-26T04:41:10+5:30

00०००० शेलूबाजार येथे एक कोरोना रुग्ण वाशिम : मंगरूळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथे आणखी एकाचा कोरोना चाचणी अहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह ...

The question of barrage construction is in red tape! | बॅरेज निर्मितीचा प्रश्न लालफितशाहीत !

बॅरेज निर्मितीचा प्रश्न लालफितशाहीत !

00००००

शेलूबाजार येथे एक कोरोना रुग्ण

वाशिम : मंगरूळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथे आणखी एकाचा कोरोना चाचणी अहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह आला आहे. आरोग्य विभागाने सर्वेक्षण केले असून, नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.

०००००००००००००००००

रोहित्र बदलून देण्याची मागणी

वाशिम : किन्हीराजा जिल्हा परिषद गटातील नादुरूस्त विद्युत रोहित्र बदलून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी महावितरणकडे केली. काही रोहित्र नादुरुस्त असल्याने वीजपुरवठा अधून-मधून खंडित होत आहे. याकडे लक्ष देणे आवश्यक ठरत आहे.

000000000000000000

शहरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रिसोड, मालेगाव शहरात सकाळी ११ वाजल्यानंतर दुकाने सुरू राहणार नाहीत, यानुषंगाने ‘विशेष वॉच’ ठेवला जात आहे. शहरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात असल्याचे दिसून येते.

0000000000000

रस्त्यावर खड्डे ; चालक त्रस्त

वाशिम : येथून चार कि.मी. अंतरावर असलेल्या सुरकंडी रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. रस्ता दुरूस्तीची मागणी करूनही खड्डे बुजविण्यात आले नसल्याने वाहनचालकांमधून रोष व्यक्त होत आहे.

०००००००००००००

वांगी फाट्यावर वाहनांची तपासणी

वाशिम: जिल्हाभरात वाढत असलेला कोरोना संसर्ग लक्षात घेता वाहनांची तपासणी केली जात आहे. त्यात वाशिम-रिसोड मार्गावरील वांगी फाटा, नागठाणा फाटा येथे मंगळवारी पोलिसांनी वाहनांची तपासणी केली. जवळपास ३० जणांवर कारवाई केली.

००००

चिखली येथे आणखी ४ रुग्ण

वाशिम : रिसोड तालुक्यातील चिखली येथे आणखी ४ जणांचा कोरोना चाचणी अहवाल २५ मे रोजी पॉझिटिव्ह आला आहे. रुग्णसंख्या हळूहळू वाढत असल्याने आरोग्य विभाग अलर्ट झाला असून, नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी,असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले.

००००

दुपारनंतर बाजारपेठेत शुकशुकाट (फोटो)

वाशिम : कडक निर्बंध लागू असल्याने सकाळी ११ वाजतानंतर अत्यावश्यक सेवेतील मेडिकल, दवाखानेवगळता अन्य दुकाने बंद राहतात. यामुळे दुपारच्या सुमारास वाशिम शहरातील प्रमुख बाजारपेठेत शुकशुकाट दिसून येतो. सकाळी ९ ते ११ या वेळेत मात्र बाजारपेठेत गर्दी असल्याचे मंगळवारी दिसून आले.

Web Title: The question of barrage construction is in red tape!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.