Pulwama Terror Attack : वाशिम जिल्ह्यात निषेध; शहिदांना श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 02:35 PM2019-02-15T14:35:24+5:302019-02-15T14:35:29+5:30

वाशिम: जम्मू आणि कश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफ जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा जिल्हाभरातून निषेध व्यक्त होत आहे.

Pulwama Terror Attack: Prohibition in Washim District; Tribute to martyrs | Pulwama Terror Attack : वाशिम जिल्ह्यात निषेध; शहिदांना श्रद्धांजली

Pulwama Terror Attack : वाशिम जिल्ह्यात निषेध; शहिदांना श्रद्धांजली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: जम्मू आणि कश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफ जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा जिल्हाभरातून निषेध व्यक्त होत आहे. या हल्ल्यात शहीद झालेल्या ४४ जवांनाना ठिकठिकाणी सभा घेऊन शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली, तर  व्हॉटसअ‍ॅप, फेसबुकसारख्या सोशल मिडियावरही शहिदांप्रती शोक संवेदना व्यक्त करण्यात येत आहेत.
जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे १४ फेब्रुवारी २०१९ रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात ४४ जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाºया केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण ७८ वाहने होती आणि त्यातून एकूण २,५४७  जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर ३५० किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला. या हल्ल्याचा देशभरात निषेध आणि संताप व्यक्त होत असून, वाशिम जिल्ह्यातही या हल्ल्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. जिल्ह्यातील अनेकांनी व्हॉटसअ‍ॅप, फेसबुकसारख्या सोशल मिडियावर या हल्ल्याचा निषेध करतानाच शहीदांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबियांप्रती शोक संवेदना व्यक्त केल्या, तर काही ठिकाणी शोकसभा घेऊन शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. मंगरुळपीर येथील नगर परिषद कार्यालयात नगराध्यक्ष डॉ. गजाला खान, उपाध्यक्ष विरेंद्र सिंह ठाकूर, स्विकृत नगरसेवक अ‍ॅड. मारुफ खान, भाजप नगरसेवक अनिल गावंडे, अबरार कुरेशी यांच्यासह अधिकारी, कर्मचाºयांनी शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली.

Web Title: Pulwama Terror Attack: Prohibition in Washim District; Tribute to martyrs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.