शासकीय तूर खरेदी घोटाळ्याच्या चौकशीसाठी लोकप्रतिनिधींचाही पुढाकार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 04:12 PM2017-10-24T16:12:12+5:302017-10-24T16:14:43+5:30

वाशिम: जिल्ह्यातील अनसिंग येथे शासकीय तूर खरेदी केंद्रात झालेल्या कथित घोटाळ्याचीचौकशी करण्यासाठी जिल्ह्यातील आमदार, जि.प., न.प. सदस्यांसह विविध पक्षाच्या पदाधिकाºयांनीही पुढाकार घेतला आहे. 

Public Representative Initiative for Investigation of Government arhar Purchase Scam | शासकीय तूर खरेदी घोटाळ्याच्या चौकशीसाठी लोकप्रतिनिधींचाही पुढाकार 

शासकीय तूर खरेदी घोटाळ्याच्या चौकशीसाठी लोकप्रतिनिधींचाही पुढाकार 

Next
ठळक मुद्देप्रशासनावर दबावतक्रारकर्त्याच्या उपोषणाची दखल

वाशिम: जिल्ह्यातील अनसिंग येथे शासकीय तूर खरेदी केंद्रात झालेल्या कथित घोटाळ्याचीचौकशी करण्यासाठी जिल्ह्यातील आमदार, जि.प., न.प. सदस्यांसह विविध पक्षाच्या पदाधिकाºयांनीही पुढाकार घेतला असून, या संदर्भात वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू करण्यात आलेल्या उपोषणाला त्यांच्याकडून पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. 

जिल्ह्यात यंदा अनसिंग येथील विदर्भ कृषी प्रक्रिया व पणन सहकारी संस्थेकडून खरेदी करण्यात आलेल्या तुरीपैकी ३ ते ४ हजार क्विंटल तुरीची चोरी झाल्याचा आरोप अनसिंग येथील हरीष सारडा यांनी केला असून, याबाबत त्यांनी जिल्हाधिकाºयांकडे निवेदन सादर करीत चौकशी करण्याची मागणी केली होती, तसेच २३ आॅक्टोबरपासून यासाठी उपोषण सुरू करणार असल्याचा इशारा दिला होता. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हरीष सारडा यांच्यासह ५० हून अधिक लोकांनी उपोषण सुरू केले. या प्रकाराची दखल जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी घेत या उपोषणाला आपला पाठिंबा जाहीर करीत तूर खरेदीतील घोटाळ्याची चौकशी करण्याच्या मागणीसाठी पुढाकारच घेतला आहे. कारंजा-मानोराचे आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटणी, रिसोड-मालेगावचे आमदार अमित झनक, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेश पाटील, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाकधने, शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते नारायण विभुते, वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष, दामू अण्णा गोटे, जि.प. सदस्य नथ्थूजी कापसे, वाशिम पालिकेचे बांधकाम सभापती कैलास गोरे, राकॉ विधी सेल जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संतोष पोफळे, नगरसेवक गौतम सोनोने, बंजारा सेना तालुकाध्यक्ष सुरेश राठोड, किशोर सरडे, राजू पायघन, सुर्यप्रकाश दहात्रे, निरंजन गरडे, वसंतराव राठोड, नितिन मडके आदिंनी या उपोषणाला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तूर खरेदी घोटाळ्याच्या चौकशीसाठी प्रशासनावर दबाव वाढला असून, या संदर्भात जिल्हाधिकाºयांनी जिल्हा उपनिबंधकांना पत्र पाठवून या संदर्भात तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. 

Web Title: Public Representative Initiative for Investigation of Government arhar Purchase Scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.