शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
4
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
5
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
6
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
7
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
8
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
9
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
10
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
11
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
12
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
13
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
14
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
15
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
16
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
17
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
18
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
19
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
20
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी दुकानाच्या बिलातून जनजागृती

By admin | Updated: March 15, 2015 00:49 IST

वाशिम जिल्ह्यातील जनजागृतीसाठी अभिनव उपक्रम.

दादाराव गायकवाड / वाशिम : स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासन अनेक योजना राबवित जनजागृती करीत आहे. सरकारच्या या प्रयत्नांना हातभार लावून स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी, तसेच बेटी बचाओ अभियानाचा प्रचार करण्यासाठी कारंजा येथील एका ट्रॅक्टर व्यावसायिकाकडून दुकानाच्या बिलांचा वापर केला जात आहे. देशात महिलांचे पुरूषांमागील दरहजारी प्रमाण कमी आहे. ब्रिटिश मेडिकल र्जनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार १९८0 ते २0११ या दरम्यानच्या काळात भारतात १.२0 कोटी मुलींची गर्भातच हत्या करण्यात आल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. स्त्रीभ्रूण हत्येचे हे प्रमाण लक्षात घेता, राज्य सरकार आणि केंद्र सरकारमार्फत स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी विविध योजना राबविल्या जातात. एक सामाजिक बांधिलकी म्हणून ट्रॅक्टरचे सुटे पार्टस्, तसेच ट्रॅक्टर्सची विक्री करणार्‍या कारंजा येथील एका व्यावसायिकाने दुकानाच्या बिलावर स्त्रीभ्रूण हत्या रोखण्याचा संदेश मुद्रीत केला. या बिलाच्या माध्यमातून स्त्रीभ्रूण हत्या रोखण्याबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न ते गत दोन वर्षांपासून करीत आहेत. खुडू नको कळी आई.. जगू दे गं मला, दिवा हवा वंशाचा पणती नको का गं तुला अशी मार्मिक ओळ या व्यवसायिकाने बिलाच्या मागील बाजूला दिली आहे. ह्यभ्रूणहत्या एक ऐसा अपराध है, जिसका कोई प्रायश्‍चित्त नहीह्ण असाही संदेश या व्यवसायिकाने दिला आहे. ह्यया जगात कोणतीही मुलगी ही तिच्या पतीसाठी त्याची राणी नसेलही कदाचित; पण.. तिच्या वडिलांसाठी नेहमीच ती एक सुंदर परी असेलह्ण, एका पित्याला हेलावून टाकणार्‍या या हृदयस्पश्री ओळीही बिलाच्या माध्यमातून लोकांच्या मनावर ठसवण्याचा प्रयत्न हा व्यवसायिक करीत आहे.