उष्माघातापासून संरक्षणासाठी जनजागरण
By Admin | Updated: April 23, 2017 13:41 IST2017-04-23T13:41:09+5:302017-04-23T13:41:09+5:30
कवठा आरोग्य केंद्र अंतर्गत उष्माघातापासून बचावाकरिता मार्गदर्शन सभा घेण्यात आली असून याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

उष्माघातापासून संरक्षणासाठी जनजागरण
वाशिम :देऊळगाव बंडा येथे नुकतेच कवठा आरोग्य केंद्र अंतर्गत उष्माघातापासून बचावाकरिता मार्गदर्शन सभा घेण्यात आली असून याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी उष्माघात होण्याची कारणे व त्यापासून बचाव करण्याचे उपाय सांगितले. कारणामध्ये उन्हाळ्यामध्ये श्ेतावर अथवा मजुरीचे काम फार वेळ करणे, बॉयलर रुमध्ये काम करणे, घट्ट कपड्याचा वापर करणे, उष्माघात होण्याची लक्षणे, थकवा, येणे, ताप येणे, त्वाचा कोरडी पडणे, भुक न लागणे, चक्कर येणे निरुत्साही होणे, डोके दुखने, रक्तदाब वाढणे, मानसीक बैचेन इत्यादी. प्रतिबंधात्मक उपायामध्ये वाढत्या तापमानात कष्टाची कामे टाळावी, पांढऱ्या रंगाची कपडे परिधान करावे, भरपुर पाणी प्यावे, जलसजीवनाचा वापर करावा, इत्यादीबद्दल अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यावेळी डॉ.हेबांडे, ठाकरे, डॉ.लोमटे, डॉ.गायकवाड, कालापाड, अनिता सरनाईक, अंगणवाडी सेविका स्वाती सरनाईक, अन्नपूर्णा मसुरकर, कल्पना सरनाईक, रंजना गरड, अनिल सरनाईक,विनोद भारती, तसेच गावातील असंख्य मंडळी उपस्थित होते.