व्यावसायिकांसह ग्राहकांशी संवाद साधून  विध्यार्थी करताहेत प्लास्टिकबंदीबाबत जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 14:35 IST2018-01-16T14:32:11+5:302018-01-16T14:35:17+5:30

वाशिम: सरस्वती समाजकार्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी प्लास्टिकबंदीबाबत जनजागृती करून प्लास्टिक निर्मुलन करण्याचा निर्धार केला आहे.

Public awareness on the issue of plastic ban by students | व्यावसायिकांसह ग्राहकांशी संवाद साधून  विध्यार्थी करताहेत प्लास्टिकबंदीबाबत जनजागृती

व्यावसायिकांसह ग्राहकांशी संवाद साधून  विध्यार्थी करताहेत प्लास्टिकबंदीबाबत जनजागृती

ठळक मुद्देवाशिम येथील सरस्वती समाजकार्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी जनजागृती करण्याचे ठरविले आहे.या अंतर्गत वाशिम शहरातील मुख्य बाजारासह विविध ठिकाणी किरकोळ आणि ठोक व्यवसाय करणाऱ्या दुकांनांच्या भेटी हे स्वयंसेवक दर शुक्रवारी घेत आहेत. या भेटीत दुकानदार आणि ग्राहकांशी संवाद साधून त्यांना प्लास्टिक न वापरण्याचे आवाहन करण्यात आले.  

वाशिम: सरस्वती समाजकार्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी प्लास्टिकबंदीबाबत जनजागृती करून प्लास्टिक निर्मुलन करण्याचा निर्धार केला आहे. या अंतर्गत वाशिम येथील बाजारात दर शुक्रवारी फिरून किरकोळ विक्रेते  आणि मोठ्या व्यावसायिकांसह ग्राहकांशी संवाद साधून त्यांना प्लास्टिक पिशव्याचा वापर टाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

शासनाने प्लास्टिकबंदीचा निर्णय घेतला आहे. प्लास्टिकचा वापर पर्यावरणासाठी घातक असून, कचºयात पडणाºया प्लास्टिक पिशव्या पोटात गेल्याने गाई, म्हशीसारखी जनावरे दगावत आहेत, तर पाण्यात पडणाºया प्लास्टिकमुळे जलचरांच्या अस्तित्वावरही संकट आले आहे. समाजातील प्रत्येक घटकाला प्लास्टिकच्या दुष्परिणामांची माहिती असावी आणि त्यांनी प्लास्टिकचा वापर टाळून पर्यावरण रक्षणात सहभागी व्हावे, या उद्देशाने वाशिम येथील सरस्वती समाजकार्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी जनजागृती करण्याचे ठरविले आहे. या अंतर्गत वाशिम शहरातील मुख्य बाजारासह विविध ठिकाणी किरकोळ आणि ठोक व्यवसाय करणाºया दुकांनांच्या भेटी हे स्वयंसेवक दर शुक्रवारी घेत आहेत. या भेटीत दुकानदार आणि ग्राहकांशी संवाद साधून त्यांना प्लास्टिक न वापरण्याचे आवाहन करण्यात आले.  या उपक्रमात रोशन व्यवहारे, पुजा चाटी, संतोष नालिंदे, शामबाला जाधव, गणेश लोंढे, कुंभारे, श्याम बरगे, शुभा इंगळे, गोपाल चव्हाण, मंगेश कोरडे, प्रदीप टेकाळे, रामेश्वर इंगळे आदि स्वयंसेवकांसह प्रा. ए. पी. राऊत, डॉ. डी. एस. अंभोरे आणि प्रा. ए. टी. वाघ सहभागी होत आहेत. गत शुक्रवारी शहरात ही मोहिम राबविण्यात आली. 

Read in English

Web Title: Public awareness on the issue of plastic ban by students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.