शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करा; शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी कारंजात रास्ता रोको आंदोलन

By संदीप वानखेडे | Updated: October 9, 2023 17:05 IST

कारंजा बायपासवर वाहने रोखली

वाशिम : कारंजा आणि मानोरा तालुक्यामधील पिकांचे वन्य प्राण्यांकडून मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. वन्यप्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करणे, पीक नुकसानभरपाई देणे यांसह शेतकऱ्यांच्या अन्य मागण्यांसाठी ९ ऑक्टोबर रोजी कारंजा येथील झाशी राणी चौक बायपास येथे समनक जनता पार्टीतर्फे तासभर रास्ता रोको आंदोलन केले.

वन्य प्राण्यांमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची नुकसान भरपाई त्वरित मिळावी,  शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, शेतकऱ्यांच्या जीवांचे व पिकांचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण करण्याबाबत उपाययोजना कराव्या , शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी व शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी उपायोजना राबवावी आदी मागण्या करण्यात आल्या. सामाजिक वनीकरण, वन्यजीव संरक्षण विभाग व वनपरिक्षेत्राकडून जोपर्यंत वनपरिक्षेत्रात पक्के कुंपण होत नाही, तोपर्यंत प्राण्यांमुळे होणारी शेतकऱ्यांची जीवितहाणी तसेच नुकसानीची भरपाई सरसकट देण्यात यावी, अशीही मागणी केली.

कार्यकर्त्यांनी बायपास परिसरात रस्ता रोखून धरला आणि वनविभाग व शासनाच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. तासभर चाललेल्या या आंदोलनामुळे बायपास परिसरात असलेल्या सर्व रस्त्यांवर शेकडो वाहने थांबली होती. समनक जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. रामकृष्ण कालापाड,  राष्ट्रीय नेते प्रा. डॉ.  अनिल राठोड, जिल्हाध्यक्ष गजानन धामणे यांच्या मार्गदर्शनात कारंजा-मानोरा विधानसभा अध्यक्ष प्रकाश बळीराम राठोड यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी सहाय्यक वनसंरक्षक (रोहयो)  छत्रपती चव्हाण यांनी आंदोलनास भेट देऊन मागण्यांचे निवेदन स्विकारले आणि पूर्ततेसाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिले.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी