जप्तीचा ६६ लाखांचा मुद्देमाल मूळ मालकांच्या स्वाधीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:34 IST2021-01-09T04:34:20+5:302021-01-09T04:34:20+5:30

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी ठाकरे यांच्यासह सर्व पोलीस ठाण्याचे प्रमुख, मदतनीस व अंमलदारांना तसेच तक्रारदार, फिर्यादींना ८ ...

Property worth Rs 66 lakh confiscated | जप्तीचा ६६ लाखांचा मुद्देमाल मूळ मालकांच्या स्वाधीन

जप्तीचा ६६ लाखांचा मुद्देमाल मूळ मालकांच्या स्वाधीन

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी ठाकरे यांच्यासह सर्व पोलीस ठाण्याचे प्रमुख, मदतनीस व अंमलदारांना तसेच तक्रारदार, फिर्यादींना ८ जानेवारी रोजी जुने पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर आमंत्रित करण्यात आले. त्या ठिकाणी ६६ लाख ६७ हजार ९३३ रुपये किमतीचा मुद्देमाल संबंधितांच्या स्वाधीन करण्यात आला. यात वाशिम शहरातील ४८ लाख १४ हजार, ग्रामीण १ लाख १५ हजार, शिरपूर ७ हजार, रिसोड ५५ हजार, मंगरूळपीर १ लाख २० हजार, कारंजा ६ लाख २५ हजार ५००, मानोरा ७ हजार आणि धनज पोलीस ठाण्यांतर्गत २० हजारांच्या मुद्देमालाचा समावेश आहे. यासह सायबर विभागाकडून गहाळ झाल्यानंतर जप्त करण्यात आलेले ९ लाख ३ हजार ९३३ रुपये किमतीचे ९४ मोबाइलही मूळ मालकांना परत करण्यात आले.

Web Title: Property worth Rs 66 lakh confiscated