प्रकल्पाचे गेट नादुरुस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:16 IST2021-02-06T05:16:59+5:302021-02-06T05:16:59+5:30

--- कार शिरली शेतात धनज बु.: कामरगाव-कारंजादरम्यान राष्ट्रीय महामार्गावर अपघात घडण्याचे सत्र सुरूच असून, गुरुवारी येथे चालकाचे नियंत्रण सुटून ...

Project gate incorrect | प्रकल्पाचे गेट नादुरुस्त

प्रकल्पाचे गेट नादुरुस्त

---

कार शिरली शेतात

धनज बु.: कामरगाव-कारंजादरम्यान राष्ट्रीय महामार्गावर अपघात घडण्याचे सत्र सुरूच असून, गुरुवारी येथे चालकाचे नियंत्रण सुटून कार शेतात शिरली. सुदैवाने यात कोणतेही नुकसान झाले नाही किंवा कुणाला दुखापतही झाली नाही.

---------

मोखड प्रकल्पात २५ टक्के साठा

उंबर्डा बाजार: कारंजा तालुक्यातील बहुतांश प्रकल्पांच्या पातळीत लक्षणीय घट होत आहे. त्यात मोखड पिंप्री येथील सिंचन प्रकल्पात आधीच अपुरा साठा असताना सिंचनासाठी उपसा झाल्याने या प्रकल्पात केवळ २५ टक्के जलसाठा उरला आहे.

---------

समृद्ध गाव स्पर्धेंतर्गत मार्गदर्शन

कामरगाव: पाणी फाऊंडेशन आणि जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून राबविण्यात येत असलेल्या समृद्ध गाव स्पर्धेंतर्गत कृषी विभागाकडून गुरुवारी कामरगाव परिसरातील गावांत शेतकऱ्यांना सेंद्रीय खत निर्मितीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

----------

पोहरादेवीत लसीकरण मोहीम

पोहरादेवी: आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात ३१ जानेवारीपासून पोलिओ लसीकरण मोहीम राबविली जात आहे. या अंतर्गत पोहरादेवी येथील बसथांब्यावर आशासेविका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी गुरुवारी २४ बालकांना पोलिओ डोस पाजले.

------------

मालेगाव तालुक्यात ४ बाधित

वाशिम: मालेगाव तालुक्यातील आणखी चौघांना कोरोना संसर्ग असल्याचे आरोग्य विभागाच्या बुधवारी प्राप्त अहवालावरून स्पष्ट झाले आहे. त्यात मालेगाव शहरातील १, करंजी येथील १, उमरदरी येथील १, चोंडी येथील १ व्यक्ती बाधित असल्याचे निदान झाले आहे.

Web Title: Project gate incorrect

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.