सात कृषी सेवा केंद्राच्या तपासणीत आढळल्या त्रूटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2019 04:36 PM2019-07-07T16:36:56+5:302019-07-07T16:37:07+5:30

वाशिम : कृषी विभागातर्फे कृषी सेवा केंद्रांची झाडाझडती घेतली जात असून, ५ ते ७ जुलैदरम्यान वाशिम शहरातील एकूण सात कृषी सेवा केंद्राच्या तपासणीत काही त्रूटी आढळून आल्या.

Problems detected in checking of Seven Agricultural Service Centers | सात कृषी सेवा केंद्राच्या तपासणीत आढळल्या त्रूटी

सात कृषी सेवा केंद्राच्या तपासणीत आढळल्या त्रूटी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कृषी विभागातर्फे कृषी सेवा केंद्रांची झाडाझडती घेतली जात असून, ५ ते ७ जुलैदरम्यान वाशिम शहरातील एकूण सात कृषी सेवा केंद्राच्या तपासणीत काही त्रूटी आढळून आल्या. दोन कृषी सेवा केंद्रातील सात लाख रुपये किंमतीचे तणनाशक व किटकनाशक तसेच पाच कृषी सेवा केंद्रातील सोयाबीन बियाण्याच्या १६३ बॅग विक्री बंदचे आदेश कृषी विभागाने दिले. 
खरिप हंगामात शेतकºयांची फसवणूक होणार नाही याची दक्षता कृषी सेवा केंद्रांनी घ्यावी तसेच अवैध मार्गाने खते व बियाणे विक्री करू नये अशा सूचना कृषी विभागाने दिलेल्या आहेत. काही कृषी सेवा केंद्र याची दक्षता घेत आहेत तर काही कृषी सेवा केंद्रांमध्ये नियमांची अंमलबजावणी केली जात नसल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे प्राप्त होत आहेत. यासंदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार यांनी आढावा घेत तपासणी क रण्याचे निर्देश दिले. त्याअनुषंगाने ३ जुलैपासून जिल्हास्तरीय तसेच तालुकास्तरीय भरारी पथकातर्फे तपासणी केली जात आहे. वाशिम पंचायत समिती कृषी विभागाकडून ५ ते ७ जुलै दरम्यान तपासणी केली असता, काही कृषी सेवा केंद्राच्या नोंदवहीत त्रूटी आढळून आल्या.  नियमांचे उल्लंघन करणाºया दोन कृषी सेवा केंद्रातील सात लाख ६१ हजार २१४ रुपये किंमतीचे ६०१ लिटर तणनाशक व कीटकनाशक विक्रीस बंदी घालण्यात आली आहे तसेच त्यांना सात दिवसात त्रुटींची पूर्तता व खुलासा सादर करणेसाठी नोटिस बजावण्यात आली. विक्री परवानामध्ये समविष्ट नसलेली उत्पादने खरेदी-विक्री करीत असल्याने सदर विक्री बंद आदेश देण्यात आले. तसेच साठा फलक व साठा पुस्तक अद्यावत न ठवणे, मुक्तता अहवाल आढळून न आलेल्या पाच  कृषी सेवा केंद्रातील दोन लाख ९ हजार ७०० रुपये किंमतीच्या सोयाबीन बियाण्याच्या १६३ बॅगवर तसेच तूरीच्या ९ बॅगवरसुद्धा विक्री बंद आदेश देण्यात आले. खबरदारी म्हणून बियाण्यांचे २१ नमुने व खतांचे पाच नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले असून, तपासणी अहवाल प्राप्त होताच पुढील कारवाई केली जाईल, असे कृषी विभागाने स्पष्ट केले. 

 
टोल फ्री क्रमांकावर करता येईल तक्रार !
शेतकºयांनी कृषी निविष्ठांची खरेदी ही अधिकृत विक्रेत्यांकडूनच करावी, पक्के बिल घ्यावे, असे आवाहन कृषी विभागाने केले. खते, बियाणे, किटकनाशक आदीसंदर्भात काही तक्रार असल्यास तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितीचे कृषी अधिकारी किंवा कृषी विभागाचा १८००२३३४००० या टोल फ्री क्रमांकावरही शेतकºयांना तक्रार नोंदविता येणार आहे. कृषि सेवा केंद्रधारकांनी आपल्या परवान्यात समाविष्ठ असलेल्या उत्पादनांचीच खरेदी-विक्री करावी. ज्या उत्पादनांची खरेदी-विक्री करावयाची आहेत ती आपल्या परवान्यामध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी प्रक्रिया करावी व परवाना अधिकारी यांची मान्यता असल्यास विक्री करावी, अशा सूचना पंचायत समितीचे कृषी अधिकारी तथा गुण नियंत्रण निरीक्षक रमेश भद्रोड यांनी केल्या.

Web Title: Problems detected in checking of Seven Agricultural Service Centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम