शहरं
Join us  
Trending Stories
1
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
2
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
3
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
4
नागरिकत्व नियमांमध्ये मोठे बदल! अल्पवयीन मुलांसाठी पासपोर्टचे नियम अधिक कडक, OCI नोंदणी ऑनलाइन
5
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटवर मोठी कारवाई, ३४९ किलो हाय-ग्रेड कोकेन पकडले, किंमत हजारो कोटींमध्ये 
6
बजाजचा बाजारात धमाका! नवीन Pulsar NS400Z लॉन्च; किंमत झाली कमी अन् फीचर्समध्येही तडजोड नाही
7
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
9
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
10
राजश्री देशपांडेने आत्मविश्वासाने दाखवल्या ब्रेस्ट कॅन्सरच्या खुणा, फोटो शेअर करत म्हणाली...
11
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
12
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
13
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
14
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
15
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
16
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
17
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
18
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
19
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
20
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
Daily Top 2Weekly Top 5

पिककर्ज वितरणात चलन तुटवड्याची अडचण

By admin | Updated: April 11, 2017 21:19 IST

बँंकाना कर्ज वितरण करताना रोखीची अडचण येत असल्याचे दिसते. प्रत्यक्षात कर्जाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वळती करण्यात येत असली तरी, शेतकऱ्यांना तो पैसा एटीएममधून काढावा लागत आहे

वाशिम: यंदाच्या खरीप हंगामासाठी पिककर्ज वितरणाला प्रारंभ झाला आहे; परंतु बँंकाना कर्ज वितरण करताना रोखीची अडचण येत असल्याचे दिसते. प्रत्यक्षात कर्जाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वळती करण्यात येत असली तरी, शेतकऱ्यांना तो पैसा एटीएममधून काढावा लागत आहे; परंतु बँकांकडे एटीएममध्ये टाकण्यास पुरेशी रक्कमच नसल्याने शेतकरी आणि बँकांची मोठी पंचाईत झाली आहे. प्रामुख्याने अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेला या अडचणीचा सामना करावा लागत आहे. शासनाच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर निर्माण झालेला चलन तुटवडा अद्यापही लोकांना त्रस्त करीत आहे. त्यावर पर्याय म्हणून कॅशलेस व्यवहारांवर भर देण्यात येत असला तरी, त्यामुळे समस्या सुटू शकत नसल्याचे दिसते. सद्यस्थितीत खरीप हंगामासाठी बँकांमार्फत शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्यात येत आहे. जिल्ह्यात विविध बँकांचे एकूण १ लाख ९८ हजार ५४० शेतकरी खातेदार आहेत. त्यापैकी १ लाख ६२ खातेदार पिककर्जासाठी पात्र आहेत. यावर्षी सर्व  बँका मिळून ११५० कोटी रुपयांचे पीककर्ज शेतकऱ्यांना वितरित करणार आहेत. पिककर्जाची रक्कम रोखीने न देता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येत आहे. जिल्ह्यात शेतकऱ्यांना सर्वाधिक कर्ज पुरवठा करणारी अकोला जिल्हा मध्सवर्ती बँक शेतकऱ्यांच्या रूपे केसीसी कार्डवर पैसे जमा करीत आहे. आता ही रक्कम शेतकऱ्यांना त्यांच्या एटीएममधून काढावी लागते आणि एटीएममध्ये टाकण्यासाठी बँकेकडे पुरेसे पैसेही नाहीत. बँकेच्या वाशिम येथील मुख्य शाखेला त्यांच्या दिवसभराच्या व्यवहारासाठी १० लाख रुपये मिळतात. यातील काही रक्कम त्यांना एटीएममध्ये टाकावी लागते. त्यातच त्यांच्या एटीएममध्ये केवळ हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटाच टाकणे शक्य असून, त्यांना स्टेट बँकेकडून मिळणाऱ्या १० लाखाच्या रकमेत सर्वच नोटांचे कमी अधिक प्रमाण असते. त्यातही एटीएममध्ये पैसे टाकून काऊंटरवर विड्रॉलसाठी त्यांना रक्कम हाती ठेवावी लागते. हीच स्थिती इतरही बँकांची असल्यामुळे शेतकऱ्यांना पीककर्ज वितरण करण्यात बॅकांना अप्रत्यक्ष अडचणी येतच असल्याचे दिसते. आम्हाला दिवसभराच्या व्यवहारासाठी १० लाख रुपयांची रक्कम मिळते. यामधील काही रक्कम एटीएममध्ये टाकून काऊंटरवर वाटपासाठी काही रक्कम हाताशी ठेवावी लागते. त्यातच शेतकऱ्यांच्या रुपे कार्डमध्ये पिककर्ज जमा केले तरी, त्यांना एटीएममधूनच पैसे काढावे लागतात.- व्ही. एस. सरनाईक, व्यवस्थापक, अकोला जिल्हा मध्यवर्ती बँंक, मुख्य शाखा वाशिम