दाखलपूर्व, प्रलंबित प्रकरणांवर होणार सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:38 IST2021-08-29T04:38:54+5:302021-08-29T04:38:54+5:30

राष्ट्रीय विधि सेवा प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य विधि सेवा यांच्या निर्देशानुसार २५ सप्टेंबर २०२१ रोजी वाशिम जिल्ह्यातील सर्व तालुका ...

Prior to filing, there will be hearings on pending cases | दाखलपूर्व, प्रलंबित प्रकरणांवर होणार सुनावणी

दाखलपूर्व, प्रलंबित प्रकरणांवर होणार सुनावणी

राष्ट्रीय विधि सेवा प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य विधि सेवा यांच्या निर्देशानुसार २५ सप्टेंबर २०२१ रोजी वाशिम जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये सकाळी १०.३० ते संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले आहे. धनादेश अनादर प्रकरणे, बँकेची कर्ज वसुली प्रकरणे, कामगारांचे वाद, विद्युत आणि पाणी देयकांबद्दलची आपसात तडजोड करण्याजोगी प्रकरणे वगळून इतर प्रकरणे, आपसात तडजोड करण्याजोगी फौजदारी प्रकरणे, मोटार अपघात नुकसानभरपाई प्रकरणे, वैवाहिक वाद, भू-संपादन प्रकरणे तसेच मनाई हुकुमाचे दावे, विशिष्ट पूर्वबंध कराराची पूर्तता विषयक वाद आदी दिवाणी प्रकरणे सुनावणीसाठी ठेवण्यात येणार आहेत.

०००००००००

वाद सामोपचाराने मिटवावेत

उपरोक्त संवर्गातील प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत अथवा खटलापूर्व प्रकरणे न्यायालयात दाखल आहेत, त्यांनी आपली प्रकरणे आपसांत मिटविण्यासाठी २५ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक न्यायालयामध्ये सुनावणीसाठी ठेवण्याकरिता संबंधित न्यायालय, तालुका विधि सेवा समिती अथवा वाशिम जिल्हा विधि सेवा प्राधिकरण यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन वाशिम जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शैलजा शं. सावंत तसेच जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश संजय पां. शिंदे यांनी केले.

Web Title: Prior to filing, there will be hearings on pending cases