जुगार अड्यावर छापा
By Admin | Updated: August 9, 2014 01:20 IST2014-08-09T01:13:01+5:302014-08-09T01:20:08+5:30
वाशिम येथील काळे फैल परिसरात जुगार अड्यावर छापा; २१ हजार रूपये तथा एवज जप्त.

जुगार अड्यावर छापा
वाशिम : येथील काळे फैल परिसरात एका जुगारावर डिटेक्शन ब्रँचच्या पथकाने ७ ऑगस्ट रोजी रात्री १0 वाजता छापा टाकला. या छाप्यामध्ये आठ इसमांना अटक करून त्यांच्याकडून ५२ ताश पत्ते व रोख २१ हजार ९७६ रूपये जप्त केले.
वाशिम शहरातील काळे फैल परिसरात एका ठिकाणी जुगार सुरू असल्याची माहिती ठाणेदार संग्राम सांगळे यांना मिळाली. या माहितीच्या आधारावर डिटेक्शन ब्रँचचे प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक उदय सोयस्कर, रमेश जायभाये, सुनील पवार, राजेश बायस्कर, हरिष दंदे, सतीश गुडदे व महिला पोलिस शेख तहमिना यांच्या पथकाने छापा टाकला. या छाप्यामध्ये प्रदीप प्रकाश इंगोले, गजानन रावजी पिंजरकर, दिलीप महादेव इंगोले, विनायक अनंतराव वानखडे, विठ्ठल दत्ता इंगोले, संतोष प्रल्हाद वानखेडे, संतोष लक्ष्मण इंगोले व गजानन प्रकाश खटके यांना ५२ ताश पत्त्यासह अटक केली. त्यांच्याकडून रोख २१ हजार ९७६ रूपये जप्त केले. उपरोक्त सर्व आरोपीविरूद्ध वाशिम शहर पोलिस स्टेशनमध्ये मुंबई जुगार अँक्टप्रमाणे गुन्हा दाखल केला. अटक करून सुटका करण्यात आली.