मराठी भाषेचा आदर करणे हे आद्य कर्तव्य
By Admin | Updated: February 28, 2015 00:51 IST2015-02-28T00:51:23+5:302015-02-28T00:51:23+5:30
वाशिम निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख यांचे प्रतिपादन; मराठी दिनानिमित्त कार्यक्रम.

मराठी भाषेचा आदर करणे हे आद्य कर्तव्य
वाशिम : मराठी ही आपली मातृभाषा असून तिचा आदर करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे, असे मत निवासी उ पजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख यांनी व्यक्त केले. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जागतिक मराठी दिनानिमित्त २७ फेब्रुवारी रोजी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी बाळासाहेब बोराडे, जिल्हा सूचना व प्रसारण अधिकारी सागर हवालदार, नायब तहसीलदार राहुल वानखेडे, शेखर जोशी यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कामचारी उपस् िथत होते.पुढे बोलताना निवासी उपजिल्हाधिकारी देशमुख म्हणाले की, आज आपल्या बोलण्यामध्ये इंग्रजी भाषेतील शब्दांचा वापर वाढला आहे. ही अतिशय गंभीर बाब असून यामुळे हळूहळू मराठी भाषेतील अनेक महत्वपूर्ण शब्द लोप पावण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपली मातृभाषा जोपासण्यासाठी मराठी भाषेतील शब्द संग्रह वाढविण्याची गरज आहे. इंग्रजी भाषेबरोबरच मराठी भाषेचाही तितकाच आदर प्रत्येकाने केला पाहिजे. प्रत्येकाने महिन्यातून एक तरी मराठी पुस्तक वाचलेच पाहिजे. तसेच मराठीतून लेखन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे देशमुख म्हणाले. यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी बाळासाहेब बोराडे यांनी यावेळी जागतिक मराठी भाषा दिनाविषयी माहिती दिली. तसेच मराठी भाषेच्या आजच्या स्थितीविषयी मार्गदर्शन केले. जिल्हा सूचना व प्रसारण अधिकारी सागर हवालदार, नायब तहसीलदार राहुल वानखेडे यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले, तर रवी हटकर यांनी यावेळी कविता सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वरिष्ठ लिपिक अर्चना घुगे यांनी केले.