पितृपंधरवड्यात भोपळा खातोय भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:48 IST2021-09-24T04:48:14+5:302021-09-24T04:48:14+5:30

पितृपंधरवड्यामध्ये पित्रांचे जेवण घालण्याची प्रथा आहे. ती प्रथा पार पाडण्यासाठी ग्रामीण तसेच शहरी भागात जेवणावळी घालण्याची पद्धत आहे. त्यासाठी ...

The price of eating pumpkin in Pitrupandharvada | पितृपंधरवड्यात भोपळा खातोय भाव

पितृपंधरवड्यात भोपळा खातोय भाव

पितृपंधरवड्यामध्ये पित्रांचे जेवण घालण्याची प्रथा आहे. ती प्रथा पार पाडण्यासाठी ग्रामीण तसेच शहरी भागात जेवणावळी घालण्याची पद्धत आहे. त्यासाठी यादरम्यान विविध प्रकारच्या भाज्यांना खूप भाव येतो. परिणामी भाज्यांच्या किमती या आठवड्यात गगनाला भिडतात. यंदाही बाजारपेठेत असाच काहीसा अनुभव येत असल्याचे विक्रेते सांगत आहेत. पितृपंधरवडा सुरू असल्याने भाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक आणि दरही वाढल्याचे त्यांनी सांगितले.

००००००००००००००००००००००००००

१) भाजीपाल्याचे भाव (प्रतिकिलो)

भाजीपाला - बाजारातील दर - घराजवळ

डांगर भोपळा - २० - ४०

गवार - ४० - ६०

कारली - ४० - ४०

वांगी - २० - ३०

वाटाणा - ०० - ००

बीन्स - ४० - ६०

टोमॅटो - १० - २०

बटाटे - ३० - ४०

फ्लॉवर - २० - ४०

सिमला - ४० - ४०

००००००००००००००००००००००

२) मागणी वाढली...

पितृपंधरवड्यामध्ये ग्रामीण आणि शहरी भागांतही पित्रांचे जेवण घालण्याची प्रथा आहे. यामुळे घरोघरी जेवणावळी सुरू असल्याने भाजीपाल्याच्या मागणीत वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दिवसाला बाजारात २०० ते ३०० क्विंटल भाज्यांची आवक होत आहे. त्या तुलनेत मागणी अधिक आहे, परंतु पावसामुळे भाजीपाल्याच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे.

००००००००००००००

Web Title: The price of eating pumpkin in Pitrupandharvada