दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 01:44 IST2017-09-04T01:43:57+5:302017-09-04T01:44:37+5:30
वाशिम: ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये पाच वर्षाचा कार्यकाळ संपुष्टात येत असल्याने जिल्हय़ातील ४९१ पैकी २८७ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक ७ ऑक्टोबर रोजी हो त आहे. या निवडणुकीत बाजी मारण्यासाठी संबंधित ग्राम पंचायत क्षेत्रात मोर्चेबांधणीस प्रारंभ झाला असून, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची ही रंगीत तालीम असल्याने प्रमुख राजकीय पक्षांच्या नेतृत्वाचीही कसोटी लागणार आहे.

दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला!
सुनील काकडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये पाच वर्षाचा कार्यकाळ संपुष्टात येत असल्याने जिल्हय़ातील ४९१ पैकी २८७ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक ७ ऑक्टोबर रोजी हो त आहे. या निवडणुकीत बाजी मारण्यासाठी संबंधित ग्राम पंचायत क्षेत्रात मोर्चेबांधणीस प्रारंभ झाला असून, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची ही रंगीत तालीम असल्याने प्रमुख राजकीय पक्षांच्या नेतृत्वाचीही कसोटी लागणार आहे.
१४ व्या वित्त आयोगांतर्गत शासनाकडून विकासकामांसाठी मंजूर केला जाणारा निधी कुणाच्याही मथ्यस्तीशिवाय थेट ग्रामपंचायतींच्या खात्यात जमा केला जात आहे. त्यामुळे आपसूकच ग्रामपंचायतींना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले असून सरपंच, उपसर पंच या पदांची गरिमा वाढली आहे. याशिवाय नगर परिषदांच्या धर्तीवर ग्रामपंचायत सरपंचाची निवड थेट जन तेतून करण्याचा निर्णय यावेळच्या निवडणुकांपासून अमलात येत असल्याने गावगाड्यातील निवडणूक सहज पणे जिंकणे आणि पदाला गवसणी घालणे वाटते तेवढे सो पे राहिलेले नाही. त्यामुळे आगामी ७ ऑक्टोबर रोजी होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये खर्या अर्थाने इच्छुक उमेवारांसोबतच प्रमुख राजकीय पक्षांमधील पदाधिकार्यांनाही विजयश्री प्राप्त करण्यासाठी संघर्ष करावा लागणार असल्याचे एकंदरित चित्र आहे. त्यानुषंगाने संबंधित सर्वच ग्रामपंचायतींमध्ये स्थानिक पा तळीवरील नेत्यांकडून मोर्चेबांधणीस प्रारंभ झाला असून, विविध स्वरूपातील प्रस्थापित तथा प्रतिष्ठित आघाड्यांकडून निवडणूक लढण्याकरिता इच्छुक उमेदवार सज्ज झाले आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून भाजपाने ग्रामीण भागातील अगदी शेवटच्या घटकापर्यंत संघटनात्मक बांधणी केली आहे. त्यातूनच स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवारांचा शोध घेऊन त्यांच्या पाठीशी पक्षातील पदाधिकारी सक्षमपणे उभे राह तील. जास्तीत जास्त ग्रामपंचायतींवर भाजपाचे सर्मथक कसे निवडून येतील, याची आखणी सध्या जोमाने सुरू आहे.
- आ. राजेंद्र पाटणी, जिल्हाध्यक्ष, भाजपा
राष्ट्रवादी काँग्रेसची पाळेमुळे आधीपासूनच ग्रामीण भागात खोलवर रुजलेली आहेत. होऊ घातलेल्या ग्रामपंचाय तींच्या निवडणुकीत आमच्या गटाचे जास्तीत जास्त उमेदवार उभे करून त्यांच्या विजयासाठी प्रयत्न केले जा तील.
- चंद्रकांत ठाकरे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
भारिप-बमसंने ज्याप्रमाणे नगर परिषद निवडणुकांमध्ये बाजी मारली, त्याच पद्धतीने ग्रामपंचायत निवडणुकीतही पक्षाच्या सर्मथकांना उतरवून निवडणूक होऊ घातलेल्या २८७ पैकी जास्तीत जास्त ठिकाणी जिंकण्याचे प्रयत्न राह तील.
- युसूफ पुंजाणी, जिल्हाध्यक्ष, भारिप-बमसं
ग्रामपंचायत निवडणूक पूर्वीप्रमाणेच पक्षविरहित होत आहे. असे असले तरी आगामी जिल्हा परिषद, पंचायत समि त्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काँग्रेस कमिटी निवडणुका होत असलेल्या ग्रामपंचायतींमधील आपल्या सर्मथकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांच्या विजयासाठी सर्वंकष प्रयत्न करणार आहे.
- अँड. दिलीप सरनाईक, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस
ग्रामपंचायतीची निवडणूक राजकीय पक्षांच्या चिन्हांवर हो त नसली तरी ग्रामीण भागात शिवसेनेचा मोठा गट सक्रिय आहे. त्यातील सच्चा कार्यकर्त्यांना निवडणुकीत उभे करून त्यांच्या विजयासाठी पक्ष संपूर्ण ताकद खर्च करणार आहे.
- राजेश पाटील, जिल्हाध्यक्ष, शिवसेना
-