शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

नेत्यांच्या सभांमधील उपस्थितीचेही होतेय ‘राजकारण’

By admin | Updated: October 7, 2014 01:30 IST

वाशिम जिल्ह्यात एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोपाने निवडणुकीचे मैदान गाजतेय.

वाशिम : उमेदवारांच्या प्रचारार्थ स्टार प्रचारकांनी घेतलेल्या सभांमधील मतदारांच्या उपस्थितीचेही प्र ितस्पध्र्यांकडून राजकारण केले जात असल्याने निवडणुकीच्या आखाड्यात रंगत येत आहे. वाशिम जिल्ह्यात पार पडलेल्या तीन पक्षांच्या नेत्यांच्या सभांमधील मतदारांच्या हजेरीच्या मुद्याचे विरोधकांकडून राजकारण केले जात आहे. विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत युती व आघाडीची ताटातूट झाल्याने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भारतीय जनता पार्टीसह महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारिप-बमसं, बसपा, अपक्ष व बंडखोर उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. विधानसभेच्या रणधुमाळीत सर्वच पक्षांच्या उमेदवारांसह बंडखोर, अपक्ष उमेदवारही शड्ड ठोकून उतरले आहेत. आपण ठोकलेल्या शड्डचा आवाज आपल्या मतदारसंघात घुमला पाहिजे यासाठी पदयात्रा, प्रचारफेर्‍या, घरोघरी म तदारांच्या वैयक्तिक गाठीभेटींद्वारे प्रचारही सुरू आहे. यासोबतच पक्षाची ध्येय-धोरणे मतदारांपर्यंत पोहोचविणे, मतदारांना आपल्या उमेदवाराच्या बाजूने अनुकूल करणे, प्रतिस्पर्धी पक्ष व उमेदवाराच्या कमकुवत बाजू तसेच त्यांच्या कारनाम्यांचा लेखाजोखा मतदारांसमोर ठेवण्यासाठी प्रत्येकाकडून प्रचारसभांचे नियोजन करण्यात आले आहे. निवडणुकीतील उमेदवारांच्या लढतीचे अंतिम चित्र स्पष्ट झाल्यानंतर विविध पक्षांचे स्टार प्रचारक प्रचाराचा धुरळा उडवून राजकीय मैदान दणाणून सोडतील, असा अंदाज वर्तविला जात होता; परंतु तसे झाले नाही. आतापर्यंंत भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस व भारिप-बमसंच्या नेत्यांच्याच सभा झाल्याने काँग्रेस, शिवसेना, मनसे, बसपा नेत्यांच्या सभेची जिल्हावासीयांना प्रतीक्षाच आहे. प्रत्येक पक्षाकडून मतदारांच्या साक्षीने भरगच्च सभा घेण्याचा दावा केला जात होता. सर्वप्रथम भाज पाने वाशिम शहरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सभा घेतली. या सभेतील मतदारांच्या उपस्थि तीवरून नवीन राजकारण सुरू झाले आहे. सभा यशस्वी झाल्याचा दावा भाजपाने केला, तर दुसरीकडे या सभेकडे मतदारांनी पाठ फिरविल्याचे सांगून आमच्याच उमेदवाराची बाजू भक्कम आहे, असा प्रचार विरोधकांनी चालविला आहे. या सभेतील मतदारांच्या उपस्थितीचे विरोधक राजकारण करीत असल्याचे भाजप कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.