शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
2
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
3
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
4
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
5
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
6
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
7
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
8
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
9
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
10
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
11
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
12
Marathi News LIVE: पेट्रोल आणि डिझेल कमी वापरा, खाद्यतेलाचा वापर कमी करा, ऑनलाइन शिक्षण सुरू करा; PM मोदींचे सलग दुसऱ्या आवाहन
13
"निवडणुका जिंकण्यासाठी सरकारने देशाच्या अर्थव्यवस्थेची राखरांगोळी केली..."; काँग्रेसचा टोला
14
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
15
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
16
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
17
Photos: खूपच सुंदर दिसते निशिगंधा वाड यांची लेक ईश्वरी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
18
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
19
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
20
IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात
Daily Top 2Weekly Top 5

रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यास प्राधान्य!

By admin | Updated: May 7, 2016 01:17 IST

जलसंपदा मंत्र्यांची ग्वाही; पैनगंगा नदीवरील जुमडा बॅरेजच्या कामाची पाहणी.

वाशिम: वाशिम जिल्ह्यातील रखडलेले सर्व सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करणार असून, या प्रकल्पांना पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याची ग्वाही, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी दिलीे. पैनगंगा नदीवर वाशिम जिल्ह्यातील जुमडा येथे उभारण्यात आलेल्या बॅरेजच्या क्षेत्रीय भेटीप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी आमदार राजेंद्र पाटणी, आमदार लखन मलिक, आमदार तानाजी मुटकुळे, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेच्या शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती चक्रधर गोटे, विदर्भ पाटबंधारे विकास मंडळाचे कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे, अमरावतीचे विशेष प्रकल्प विभागाचे मुख्य अभियंता संजय घाणेकर, वाशिम पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता अजय कोहीरकर, माजी आमदार विजयराव जाधव, भाजपा युवा मोर्चाचे राज्य उपाध्यक्ष राजू पाटील राजे, कार्यकारी अभियंता जयंत शिंदे आदी उपस्थित होते.
सर्वप्रथम ना. महाजन यांनी जुमडा बॅरेजची पाहणी केली. ना. महाजन म्हणाले की, शेतीसाठी पाणी व वीज उपलब्ध करून देण्यासाठी प्राधान्य देण्यात येत असून, त्यादृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. वाशिम जिल्ह्यातील पैनगंगा नदीवर उभारण्यात येत असलेल्या ११ बॅरेजचे काम सुधारित प्रशासकीय मान्यतेअभावी रखडले होते. याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व ११ बॅरेजेसला सुधारित प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याचा निर्णय घेण्यात आला. पैनगंगा नदीवर उभारण्यात येत असलेल्या या ११ बॅरेजमध्ये सुमारे ३३. २६३ दलघमी पाणी साठा होणार आहे. त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील ५ हजार ५५४ हेक्टर व हिंगोली जिल्ह्यातील २ हजार १३६ हेक्टर असे ७ हजार ६९0 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे; तसेच दोन्ही जिल्ह्यातील ४७ गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार असल्याचा दावा ना. महाजन यांनी केला. या सर्व बॅरेजमध्ये निर्माण होणार्‍या पाणी साठय़ाचा सिंचनासाठी वापर करण्यासाठी येथील शेतकर्‍यांच्या कृषी पंपांना तातडीने वीज जोडण्या देण्याबाबत आपण स्वत: ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे ना. गिरीष महाजन यांनी सांगितले.
यावेळी आमदार राजेंद्र पाटणी म्हणाले की, वाशिम जिल्ह्याचा सिंचन अनुशेष कमी करण्यासाठी रिसोड तालुक्यातही पैनगंगा नदीवर बॅरेज उभारण्यासाठी विशेष बाब म्हणून परवानगी मिळावी. जिल्ह्यातील सर्व नद्यांचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात यावे; तसेच एकबुर्जी धरणाची उंची वाढविण्याची मागणी यावेळी आ. पाटणी यांनी केली.