उन्हाळ्यात पीपीई किटचा त्रास वाढला; वापर घटला !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:42 IST2021-05-12T04:42:28+5:302021-05-12T04:42:28+5:30
वाशिम : अगोदरच तापते ऊन आणि त्यात सहा तास पीपीई किट घालून सेवा देताना आरोग्य कर्मचाऱ्यांना इतरही समस्यांना सामोरे ...

उन्हाळ्यात पीपीई किटचा त्रास वाढला; वापर घटला !
वाशिम : अगोदरच तापते ऊन आणि त्यात सहा तास पीपीई किट घालून सेवा देताना आरोग्य कर्मचाऱ्यांना इतरही समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात कोविड केअर सेंटरमधील अनेक आरोग्य कर्मचारी व काही डॉक्टर पीपीई किटचा वापर जाणिवपूर्वक टाळताना दिसत आहेत.
जिल्ह्यात आठ कोविड केअर सेंटर, तीन सरकारी कोविड रुग्णालय यासह २० खासगी कोविड हॉस्पिटल आहेत. गतवर्षी कोरोनाची धास्ती असल्याने उन्हाळ्यातही कोविड केअर सेंटरमधील डॉक्टर, कर्मचारी हे शक्यतोवर पीपीई किटचा वापर करून सेवा देत होते. सुरुवातीला सक्ती व भीती असल्याने पीपीई किटचा वापर केला. यंदा विविध उपाययोजना करून उन्हाळ्यातील दिवसात पीपीई किटचा वापर कमी करण्याकडे डॉक्टर, कर्मचाऱ्यांचा कल असल्याचे दिसून येते. पीपीई किट घातल्यानंतर श्वास गुदमरल्याशिवाय राहात नाही. प्रचंड उकाडा होऊन काही मिनिटांतच शरीरातील त्राण निघून जाते. बरेचदा डीहायड्रेशनची शक्यता बळावते. पीपीई किट घातल्यानंतर शरीरातील घामाद्वारे क्षार निघून जातात. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. अनेकांना डोकेदुखी व चक्करसुद्धा येतात. अशा स्थितीत रुग्णांवर उपचार करणे, त्यांचे डोसेस पूर्ण करणे शक्य होत नाही. शारीरिक व मानसिकदृष्ट्या स्वस्थ असल्यानंतरच उपचाराचा प्रोटोकॉल पाळता येऊ शकतो. कोविड केअर सेंटरमध्ये बहुतांश आरोग्य कर्मचारी, नर्स व डॉक्टर बिनधास्तपणे कोविड वॉर्डात डबल मास्क लावून फिरताना दिसत आहे.
काय म्हणतात आरोग्य कर्मचारी?
कोट
जिल्हा कोविड हॉस्पिटल येथे पीपीई कीट, मास्क घालूनच जात असते. आम्हालासुद्धा आमच्या जीवाची काळजी आहे. तसेच वरिष्ठ अधिकारी विनापीपीई कीट कोविड हॉस्पिटलमध्ये प्रवेशच देत नाही. त्यामुळे पीपीई कीट घालूनच सेवा बजावत असतो.
- आरोग्य कर्मचारी
....
किमान १०० खाटांचे कोविड केअर सेंटर आहे. प्रत्येक रुग्णापर्यंत पोहोचेपर्यंत दोन ते तीन तास निघून जातात. सलग तीन तास उभे राहणे शक्य नाही. वाकल्यास किंवा बसल्यास पीपीई कीट फाटते. त्यामुळे धोका कायम आहे.
- आरोग्य कर्मचारी
...........
काय म्हणतात डॉक्टर
कोरोना वॉर्डामध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाने सुरक्षेचे साधन असलेल्या पीपीई किटचा वापर करणे आवश्यक आहे. कोविड केअर सेंटरमध्ये पूर्वीसारखाच पीपीई कीटचा वापर होत आहे. आमची चमू रुग्णांची तपासणी करताना पीपीई कीट व मास्क घालूनच सेवा बजावत असते.
- डॉक्टर
...........
कित्येकांना केवळ वॉर्डात असुरक्षित वावर केल्यानेच कोरोना झाला आहे. कोरोनाबाधित रुग्णांशी जेथे संपर्क येण्याची शक्यता असते, तेथे विनापीपीई कीट व मास्कशिवाय प्रवेशच करीत नाही.
-डॉक्टर
०००००००००००००००
०००००००००००
कोट
एखाद्या वेळेस एखादा कर्मचारी विनापीपीई कीट येत असे. मात्र दोन मास्क, हेल्मेटसारखी टोपी घालून दिसतात. पीपीई किट घालून डॉक्टर किंवा आरोग्य कर्मचाऱ्यांनी वॉर्डात फिरणे सुरक्षेचे आहे. काही वेळेला पीपीई किट असते तर काही वेळेला पीपीई किट नसते.
- उपचार घेतलेला पेशंट
00000000000000
कोट
कोविड केअर सेंटरमध्ये बरेचसे कर्मचारी केवळ साधा मास्क, कधी फेसशिल्ड लावून फिरताना दिसतात. काही डॉक्टर व कर्मचारी हे तर वरच्या मजल्यावर तपासणीसाठी येत देखील नाहीत. तळमजल्यावर असलेल्या एका खोलीत डॉक्टर व कर्मचारी हे विना पीपीई किट बसलेले असतात. तेथेच सकाळ व सायंकाळी ऑक्सिजन पातळी व तापमान मोजण्यासाठी सर्व रुग्णांना बोलाविण्यात येते. वरच्या मजल्यावर क्वचित वेळी डॉक्टर, कर्मचारी हे तपासणीसाठी येतात.
- उपचार घेतलेला पेशंट