वीजपुरवठा अनियमित; पाणीपुरवठा योजना प्रभावित
By Admin | Updated: May 6, 2017 19:26 IST2017-05-06T19:26:31+5:302017-05-06T19:26:31+5:30
तालुक्यातील जांभरूण जहागीर येथील वीजपुरवठा अनियमित असल्याने पाणीपुरवठा योजना प्रभावित होत आहे.

वीजपुरवठा अनियमित; पाणीपुरवठा योजना प्रभावित
वाशिम - तालुक्यातील जांभरूण जहागीर येथील वीजपुरवठा अनियमित असल्याने पाणीपुरवठा योजना प्रभावित होत आहे. गत काही दिवसांपासून जांभरूण जहागीर येथील वीजपुरवठा कधी खंडित तर कधी सुरळीत असा राहत आहे. गत आठ दिवसांपासून तर वीजपुरवठा जवळपास खंडितच झाला असल्याचे दिसून येते. वीजपुरवठा नसल्याने पाणीपुरवठा योजनाही प्रभावित झाली आहे. नागरिकांना दूरवरून पाणी आणण्याची कसरत करावी लागत आहे. कृषीपंपाचा वीजपुरवठा खंडित असल्याने जांभरूण जहागीर गावासह शेलगाव व फाळेगाव येथील वीजपुरवठादेखील अनियमित झाला आहे. त्यामुळे त्या गावातील पाणीपुरवठा योजनाही प्रभावित होत आहे. पिंपळगाव विद्युत उपकेंद्रांतर्गत या गावाला वीजपुरवठा करण्यात येतो. वीजपुरवठा सलग ठेवण्याची मागणी गावकऱ्यांनी शनिवारी केली.