देपूळ येथील वीजपुरवठा सुरळीत!

By Admin | Updated: October 17, 2016 02:09 IST2016-10-17T02:09:32+5:302016-10-17T02:09:32+5:30

लोकमत वृत्ताची दखल.

Power supply at Deepal is smooth! | देपूळ येथील वीजपुरवठा सुरळीत!

देपूळ येथील वीजपुरवठा सुरळीत!

देपूळ, दि. १६- सिंगल फेज योजनेत बिघाड झाल्याने सलग चार दिवस गाव अंधारात होते. दरम्यान, १४ ऑक्टोबरला ह्यलोकमतह्णने यासंबंधी वृत्त प्रकाशित करताच महावितरणने त्याची दखल घेत बिघाड दूर करून वीजपुरवठा सुरळीत करून दिला. देपूळ येथे सिंगल फेज योजना कार्यान्वित आहे; मात्र विद्युत भार वाढल्यामुळे सिंगल फेज योजनेवर ह्यताणह्ण वाढला. अशातच विद्युत रोहित्र जळून नादुरुस्त झाले. यामुळे संपूर्ण गावकर्‍यांना सलग ४ दिवस अंधारात वास्तव्य करावे लागले. याप्रकरणी ह्यलोकमतह्णने १४ ऑक्टोबरच्या अंकात सविस्तर वृत्त प्रकाशित केले. त्याची दखल घेत महावितरणने उद्भवलेला तांत्रिक बिघाड दूर केल्याने वीजपुरवठा सुरळीत झाला.

Web Title: Power supply at Deepal is smooth!