विद्युत वाहिनीमुळे कुटुंबाच्या जीवितास धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:27 IST2021-06-20T04:27:50+5:302021-06-20T04:27:50+5:30

महावतपुरा येथील रहिवासी शेख लियाकत शेख सुभान हे जिल्हा वाहतूक शाखेत एक्स सर्व्हिसमन कर्तव्यावर आहेत. ते मागील अनेक ...

Power lines endanger family life | विद्युत वाहिनीमुळे कुटुंबाच्या जीवितास धोका

विद्युत वाहिनीमुळे कुटुंबाच्या जीवितास धोका

महावतपुरा येथील रहिवासी शेख लियाकत शेख सुभान हे जिल्हा वाहतूक शाखेत एक्स सर्व्हिसमन कर्तव्यावर आहेत. ते मागील अनेक वर्षांपासून महावतपुरा येथे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहेत. या ठिकाणी असलेल्या त्यांच्या घरावरून विद्युत वाहिनीची तार गेल्यामुळे त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला धोका निर्माण झाला आहे. या समस्येबाबत त्यांनी महावितरण कंपनीकडे अनेक वेळा रीतसर दाद मागितली, वारंवार पाठपुरावाही केलेला आहे. अधिकाऱ्याची भेट घेण्यासाठी महावितरणच्या कार्यालयाच्या पायऱ्या झिजविल्या; मात्र महावितरण कंपनीकडून अद्यापपर्यंत कुठलेच सहकार्य न मिळाल्यामुळे ते स्वतः व त्याचे संपूर्ण कुटुंब भयग्रस्त अवस्थेत जीवन जगत आहेत. आता पावसाळ्याची सुरुवात झाली असून, या विद्युत दाहिनीमुळे विजेचा धक्का बसण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. महावितरण कंपनीने याबाबत त्वरित लक्ष घालून शेख लियाकत यांच्या घरावरून गेलेली विद्युत वाहिनी त्वरित मोकळी करून त्यांना सुरक्षेची हमी द्यावी, अशी मागणी ते करीत असून, दखल न घेतल्यास महावितरण कार्यालयासमोर उपोषण करावे लागेल, असे त्यांनी सांगितले.

Web Title: Power lines endanger family life