‘बर्ड फ्लू’च्या भीतीने कुक्कुटपालन व्यावसासायिक अडचणीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:31 IST2021-01-10T04:31:16+5:302021-01-10T04:31:16+5:30

शेतीला जोडधंदा म्हणून भर जहाँगीर परिसरामध्ये अनेक सुशिक्षित बेरोजगार युवकांनी गत पाच-सहा वर्षांपासून कुक्कुट पालन व्यवसाय थाटला आहे. वेगवेगळ्या ...

Poultry business in trouble due to fear of bird flu! | ‘बर्ड फ्लू’च्या भीतीने कुक्कुटपालन व्यावसासायिक अडचणीत!

‘बर्ड फ्लू’च्या भीतीने कुक्कुटपालन व्यावसासायिक अडचणीत!

शेतीला जोडधंदा म्हणून भर जहाँगीर परिसरामध्ये अनेक सुशिक्षित बेरोजगार युवकांनी गत पाच-सहा वर्षांपासून कुक्कुट पालन व्यवसाय थाटला आहे. वेगवेगळ्या खासगी कंपन्यांसोबत करार करून सुमारे १० हजार पक्ष्यांचे संगोपन केले जाईल एवढ्या आकाराचे शेड निर्माण केले. मात्र कोरोनामुळे व्यावसायिक अडचणीत आले होते. अनलॉकच्या टप्प्यात कुक्कुटपालन व्यवसाय हळूहळू पूर्वपदावर आला. गत दोन महिन्यांपासून कुक्कुटपालन व्यवसाय बऱ्यापैकी सुरू असताना, अलीकडच्या काळात राजस्थान, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेशात बर्ड फ्लूमुळे पक्ष्यांचा मृत्यू होत आहे. विदर्भात सध्या बर्ड फ्लूचे संकट आलेले नाही. आगामी काळातही ‘बर्ड फ्लू’चा शिरकाव जिल्ह्यात होऊ नये म्हणून पशूसंवर्धन विभाग अलर्ट झाला आहे. दरम्यान, बर्ड फ्लूच्या भीतीने भर जहाँगीर परिसरातील कुक्कुटपालक धास्तावल्याचे दिसून येते. एका-एका ‘पोल्ट्री फॉर्म’मध्ये सुमारे १० हजारांपर्यंत पक्षी मर्यादा आहे. एका पिल्लाचा सांभाळ करताना सरासरी १६० ते १८० रुपये खर्च येतो. ‘बर्ड फ्लू’च्या भीतीने पोल्ट्री फॉर्म ओस पडत असल्याचे चित्र भर जहाँगीर परिसरात पाहावयास मिळत आहे.

०००

शेतीला जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन करावे, असा सल्ला शेतकऱ्यांना दिला जातो. कुक्कुटपालन व्यवसाय हा शेतीशी निगडित असल्याने शासनाकडून विमा कवच मिळणे अपेक्षित आहे. विम्यामुळे संकटकाळी भरपाई मिळू शकेल.

- डॉ. ज्ञानेश्वर फड, कुक्कुटपालन व्यावसायिक

००

मागील तीन वर्षांपासून पोल्ट्रीफॉर्मचा व्यवसाय करीत आहे. व्यवसाय चांगला आहे. परंतु ‘बर्ड फ्लू’च्या अफवेने या व्यवसायापुढे सध्या आर्थिक संकट उभे ठाकले आहे. नुकसानभरपाई मिळाल्यास दिलासा मिळेल.

- गणेश झाडे, कुक्कुटपालन व्यावसायिक

Web Title: Poultry business in trouble due to fear of bird flu!