कोरोनामुळे शाळाबाह्य मुलांच्या शोधमोहिमेस स्थगिती द्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:17 IST2021-03-04T05:17:38+5:302021-03-04T05:17:38+5:30

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिकार अधिनियम २००९ नुसार ६ ते १४ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकास शाळेच्या पटावर ...

Postpone the search for out-of-school children due to corona! | कोरोनामुळे शाळाबाह्य मुलांच्या शोधमोहिमेस स्थगिती द्या !

कोरोनामुळे शाळाबाह्य मुलांच्या शोधमोहिमेस स्थगिती द्या !

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिकार अधिनियम २००९ नुसार ६ ते १४ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकास शाळेच्या पटावर नोंदणी व्हावी, बालकांनी नियमित शाळेत येणे आणि त्याला दर्जेदार शिक्षण मिळणे हा हक्क प्राप्त झाला आहे. ऊसतोडणी, वीटभट्टी, दगडखाण, कोळसाखाणी, शेतमजुरी, बांधकाम व्यवसाय क्षेत्रातील कामांसाठी पाल्यासह कुटुंबे स्थलांतरण करीत असल्याने ६ ते १४ वयोगटातील अनेक बालके शिक्षणापासून वंचित राहतात. अशा स्थलांतरित, शाळाबाह्य बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शालेय शिक्षण विभागातर्फे १ ते १० मार्च २०२१ या कालावधीत विशेष शोध मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेचा शुभारंभ १ मार्च रोजी झाला. दरम्यान, जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शाळा बंद आहेत. जमावबंदी आदेश लागू आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या मोहिमेला तूर्तास स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी शिक्षक समितीसह संघटनांनी केली. यासंदर्भात प्राथमिक शिक्षणाधिकारी अंबादास मानकर म्हणाले की, शिक्षक संघटनांचे निवेदन प्राप्त झाले असून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार पुढील कार्यवाही केली जाईल.

Web Title: Postpone the search for out-of-school children due to corona!