रेशन दुकानांत ‘पीओएस मशीन’
By Admin | Updated: March 13, 2017 01:52 IST2017-03-13T01:52:16+5:302017-03-13T01:52:16+5:30
वापरण्याचे प्रशिक्षण; सार्वजनिक वितरण प्रणालीत पारदर्शकता.

रेशन दुकानांत ‘पीओएस मशीन’
वाशिम, दि. १२- जिल्ह्यातील सर्वच स्वस्त धान्य दुकानदारांना बायोमेट्रिक रेशन प्रणालींतर्गत पीओएस मशीनचे वाटप करुन मशीन संदर्भात प्रशिक्षण देण्यात आले आहे. जिल्ह्यातील सहाही तालुक्यांत एकूण ७७४ पीओएस मशिनचे वाटप करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील सर्वच रेशन दुकनदारांना संबंधित तहसील कार्यालयाच्यावतीने पीओएस मशीन वाटप करण्यात आले असून, काही दुकानदारांना या मशिनच्या वापराचे प्रशिक्षणही देण्यात आले आहे. येत्या आठ दिवसांत जिल्हाभरात ही प्रक्रिया पूर्ण होऊन बायोमेट्रिक रेशन प्रणालीस सुरुवात होणार आहे. या प्रणाली नुसार स्वस्तधान्य कार्डधारकांना आता मशीनमध्ये पीओएस केल्यानंतर धान्याचे वाटप होणार आहे मशीनमध्ये पीओएस केल्यानंतर ज्या कुटूंबातील शिधापत्रीका धारकाचे आधारकार्ड ऑनलाईन नोंदणी असेल तेवढयाच लोकांचे धान्य मिळणार आहे. यासाठी कुटुंबातील सदस्य धान्य घेताना आवश्यक आहे. स्वस्त धान्य विभागातील काळाबाजार रोखण्यासाठी शासनाने हे पाऊल उचलले आहे. प्रत्येक रेशन दुकानदाराला शासन पीओएस मशीन उपलब्ध करून देत आहे. या मशीनला अंगठय़ाचा थम दिल्यानंतरच या कार्डधारकाला धान्य मिळणार आहे.
आठवडाभरात बायोमेट्रिक पद्धतीने रेशन वितरण
जिल्ह्यातील रेशन दुकानदारांना पीओएस मशिनचे वाटप करण्यात आले. यामध्ये मंगरुळपीर येथील ११८ आणि कारंजा तालुक्यातील १४६ दुकानदारांचा समावेश आहे. या मशिनच्या वापराबाबतचे प्रशिक्षण दुकानदारांना देण्यात येत आहे. यासाठी तहसीलस्तरावर एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत असून, काही ठिकाणी ही प्रक्रियाही पार पडली आहे. प्रत्यक्षात रिसोड तालुक्यातील सवड आणि रिसोड शहरात दोन महिन्यांपूर्वी या मशिनचा वापर सुरू झाला असून, आठवडाभरात संपूर्ण जिल्ह्यात ही प्रणाली सुरू होण्याची शक्यता आहे.