शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
5
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
6
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
7
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
8
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
9
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
10
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
11
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
12
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
13
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
14
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
15
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
16
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
17
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
18
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
19
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
20
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
Daily Top 2Weekly Top 5

मराठीत साद, लोकांचा प्रतिसाद

By admin | Updated: October 7, 2014 23:28 IST

खामगाव येथील सभेत पंतप्रधान मोदी यांनी मराठीतून साधला लोकांशी संवाद.

बुलडाणा : मी असं एकलं होतं, खामगाव जिल्हा बनणार आहे. झाला का? रेल्वे सुरू होणार होती, झाली का? जिगाव प्रकल्पाचं काय झालं? ..किती वेळा सीएम आले अन् गेले; पण काहीच झालं नाही.. हो ना. या शब्दात चक्क मराठी भाषेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधत उपस्थित लाखो जनसमुदायाला साद घातली..लोकांनीही त्याला उत्तम प्रतिसाद देत सारे वातावरण मोदीमय करून टाकले. मैदानात, मैदानाच्या भिंतीवर, झाडांवर, आजूबाजूच्या इमारतींवर, पाण्याच्या टाकीवर; जिकडे पहावे तिकडे गर्दीच गर्दी असल्याचे चित्र सभास्थळी बघायला मिळाल्याने ही सभा रेकॉर्ड ब्रेक ठरली.येथील शासकीय तंत्रनिकेतन मैदानात सभा पार पडली. ३८ डिग्रीपर्यंत असलेल्या तापमानातही मतदारांची गर्दी ओसंडून वाहत होती. सकाळी १0 वाजतापासून तर मोदींची सभा आटोपत असतानाही ४ वाजेपर्यंत नागरिक सभास्थळी येतच होते. अकोला व बुलडाणा या दोन जिल्ह्यातील उमेदवारांची संयुक्त सभा असल्यामुळे दोन्ही जिल्ह्यातील भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी या ठिकाणी पोहोचले; तसेच नरेंद्र मोदी यांची सध्या क्रेझ असल्यामुळे सभास्थळी सकाळी दहा वाजतापासून नागरिकांचे येणे सुरू झाले होते. जवळपास दोन किमी अंतरापासून वाहनांना बंदी करण्यात आली होती.