जानोरी ते खेर्डा रस्त्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:24 IST2021-07-23T04:24:58+5:302021-07-23T04:24:58+5:30

नितीन पा. उपाध्ये यांनी केली आहे . खेर्डा बु ते घोटा पर्यंतच्या रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले असून यामधून वाहने ...

Poor condition of Janori to Kherda road | जानोरी ते खेर्डा रस्त्याची दुरवस्था

जानोरी ते खेर्डा रस्त्याची दुरवस्था

नितीन पा. उपाध्ये यांनी केली आहे .

खेर्डा बु ते घोटा पर्यंतच्या रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले असून यामधून वाहने चालविताना वाहनधारकांना माेठी कसरत करावी लागत आहे . या रस्त्यामुळे अनेक अपघात घडले असताना सुद्धा बांधकाम विभाग निद्रा अवस्थेत दिसून येत आहे. तरी सार्वजनिक बांधकाम विभाग कारंजा यांनी घोटा ते खेर्डा या १३ किमी. रस्त्याचे काम तातडीने सुरु करावे अशी मागणी काजळेश्वर येथील युवा सामाजिक कार्यकर्ते

नितीन पा . उपाध्ये यांनी केली आहे .

.......................

गत दोन वर्षांपासून सदर रस्त्याची दुरवस्था आहे . सार्वजनिक बांधकाम विभागाशी याबाबत चर्चा केली असता रस्ता काम मंजूर असल्याचे सांगण्यात येते. प्राणहानी टळावी याकरिता या रस्त्याची त्वरित दुरुस्ती अपेक्षित आहे.

नितीन पा . उपाध्ये

माजी ग्रा. पं . सदस्य काजळेश्वर .

Web Title: Poor condition of Janori to Kherda road