ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान शांततेत, सोयाबीन काढणीमुळे दुपारपर्यंत केंद्रावर शुकशुकाट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2017 14:58 IST2017-10-07T14:54:52+5:302017-10-07T14:58:38+5:30
जिल्हयातील २६१ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत असून ७ ऑक्टोंबर रोजी मतदानास सुरुवात झाली असून मतदान केंद्रावर दुपारी दोन वाजेपर्यंत ३७ टक्के मतदान झाले.

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान शांततेत, सोयाबीन काढणीमुळे दुपारपर्यंत केंद्रावर शुकशुकाट
वाशिम - जिल्हयातील २६१ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत असून ७ ऑक्टोंबर रोजी मतदानास सुरुवात झाली असून मतदान केंद्रावर दुपारी दोन वाजेपर्यंत ३७ टक्के मतदान झाले.
जिल्हयात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ७९७ मतदान केंद्रावर दुपारपर्यंत मतदान शांततेत दिसून येत असले तरी अनेक केंद्रावर सोयाबीन काढणीमुळे गर्दी दिसून आली नाही.
शेवटच्या टप्प्यात गर्दी होण्याची शक्यता आहे. मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन नजिक पांगरखेडा येथील मतदान केंद्रावर ४४४ पैकी १६८ मतदारांनी दुपारी २.३० वाजेपर्यंत ३७ टक्के मतदान केले होते.