‘त्या’ ग्रामसेवकाच्या शोधात पोलिसांचे पथक रवाना!

By Admin | Updated: June 24, 2017 04:44 IST2017-06-24T04:44:41+5:302017-06-24T04:44:41+5:30

ळप बु. ग्रामपंचायत येथे शासकीय निधीत अफरातफर करणारा आरोपी ग्रामसेवक अशोक जायभाये याचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक शुक्रवारी बुलडाणा जिल्हय़ाकडे रवाना झाले.

Police squad to search Gramsev. | ‘त्या’ ग्रामसेवकाच्या शोधात पोलिसांचे पथक रवाना!

‘त्या’ ग्रामसेवकाच्या शोधात पोलिसांचे पथक रवाना!

लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा: पंचायत समितीअंतर्गत येणार्‍या तळप बु. ग्रामपंचायत येथे शासकीय निधीत अफरातफर करणारा आरोपी ग्रामसेवक अशोक जायभाये याचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक शुक्रवारी बुलडाणा जिल्हय़ाकडे रवाना झाले आहे.
तत्कालीन ग्रामसेवक जायभाये याने खोट्या स्वाक्षर्‍या करून ग्रामपंचायतच्या सामान्य फंडातील ४८ हजार ७00 रुपये रक्कम हडपली. याप्रकरणी गटविकास अधिकार्‍यांच्या तक्रारीवरून मानोरा पोलिसांनी २३ जून रोजी गुन्हा दाखल केला.

Web Title: Police squad to search Gramsev.