पोलीसपाटील यांची पदे रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:42 IST2021-09-11T04:42:50+5:302021-09-11T04:42:50+5:30
---------- वाशिम - पुसद रस्त्याची अवस्था वाईट दगड उमरा : वाशिम ते पुसद महामार्गावरील जाभंरूण जहॉगिर फाट्यानजीक मोठमोठे खड्डे ...

पोलीसपाटील यांची पदे रिक्त
----------
वाशिम - पुसद रस्त्याची अवस्था वाईट
दगड उमरा : वाशिम ते पुसद महामार्गावरील जाभंरूण जहॉगिर फाट्यानजीक मोठमोठे खड्डे पडून रस्त्याची चाळण झाली आहे. त्यामुळे येथून जाणाऱ्या वाहनधारकांना अडचणींचा सामना करीत मार्ग काढावा लागत आहे. याच कारणामुळे या भागात अनेक अपघातही घडले आहेत.
-----------
ग्रामपंचायतींकडून नाल्यांची सफाई
वाशिम : सद्यस्थितीत गावागावांत डेंग्यू, हिवताप, विषमज्वराचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे स्वच्छता महत्त्वाची आहे. या पृष्ठभूमीवर नाल्यांतील सांडपाण्यामुळे आरोग्याला असलेला धोका लक्षात घेत तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींनी गुरुवारपासून नाल्यांची सफाई सुरू केली आहे.
----------
फवारणीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन
शेलुबाजार : कृषी विभागाच्यावतीने शेतकऱ्यांना फवारणीबाबत तांत्रिक मार्गदर्शन करण्यात येत आहे. शुक्रवारी कृषी सहाय्यकांनी शेतमजुरांना फवारणीदरम्यान कोणती काळजी घ्यायची, याबाबत विस्तृत मार्गदर्शन केले. फवारणी करताना सुरक्षा किट, डोळ्यांवर चष्मा, हातमाेजे घालून हवेच्या दिशेने फवारणी करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.