पोलीस चौक्या उरल्या नावापुरत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:16 IST2021-02-06T05:16:50+5:302021-02-06T05:16:50+5:30
------------- रोहयोतील कामांमध्ये गैरप्रकाराची तक्रार तोंडगाव : मालेगाव तालुक्यात रोहयोच्या कामांची चौकशी झाली. त्यात अनेकजण दोषी आढळले आहेत. त्याच ...

पोलीस चौक्या उरल्या नावापुरत्या
-------------
रोहयोतील कामांमध्ये गैरप्रकाराची तक्रार
तोंडगाव : मालेगाव तालुक्यात रोहयोच्या कामांची चौकशी झाली. त्यात अनेकजण दोषी आढळले आहेत. त्याच धर्तीवर इतरही तालुक्यांमधील कामांमध्ये गैरप्रकार झाले असून चौकशी करण्याची मागणी तेजराव वानखेडे यांनी संबंधितांकडे निवेदनाव्दारे केली आहे.
---------
नुकसान भरपाई देण्याची मागणी
मानाेरा : घराला अचानक आग लागून एक लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाल्याची घटना मानोरा तालुक्यातील वाईगौळ येथे ६ जानेवारी रोजी घडली. वाईगौळ येथील भीमराव विठ्ठल शिंदे यांच्या घराला अचानक आग लागली. यामध्ये घरातील संसारोपयोगी साहित्य, कपडे, रोख रक्कम, दागिने असे एक लाख रुपये किमतीचे साहित्य जळून खाक झाले. नुकसान भरपाईची मागणी आगग्रस्ताने केली आहे.
--------------
शाळांमधील सुविधांचा अभाव
मालेगाव : १४ व १५व्या वित्त आयोगातून विकासविषयक कामांसोबतच शिक्षण आणि आरोग्य या दोन प्रमुख घटकांवर एकूण खर्चाच्या २५ टक्के रक्कम खर्च करण्याची तरतूद आहे. मात्र, मालेगाव तालुक्यात जिल्हा परिषद शाळांमध्ये सुविधा पुरविण्यासाठी निधी खर्च करण्याकडे ग्रामपंचायतींचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.
--------------
गतिरोधक बसविण्याची मागणी
अनसिंग : वाशिम-अनसिंग मार्गावरील शेलू फाटा ते जागमाथा महादेव मंदिरापर्यंतच्या रस्त्यावर दिवसभर वाहने सुसाट वेगात धावत असतात. असे असताना या रस्त्यावर कुठेही गतिरोधक नसल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. बांधकाम विभागाने या रस्त्यावर गतिरोधक बसविण्याची मागणी मनसेने मंगळवारी निवेदनाद्वारे केली.
--------------
चिखलीमार्गे रिसोड-अकोला बस फेरी बंद
रिसोड : चिखली, कवठा मार्गे सुरू असलेली रिसोड-अकोला ही बस फेरी बंद झाल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. वाशिम मार्गे अकोला जाण्याची वेळ आली आहे. चिखलीमार्गे अकोला बस फेरी सुरू करण्याची मागणी कवठा येथील नंदकिशोर शर्मा यांनी बुधवारी केली.
------------
संरक्षण भिंतीसाठी निधीची मागणी
रिठद : रिठद गावालगत पूर संरक्षण भिंत उभारण्यासाठी शासनाकडून निधी मिळण्यासंदर्भात तालुका प्रशासनामार्फत यापूर्वी मागणी करण्यात आली. अद्याप शासनाकडून निधी मिळाला नाही. पूर संरक्षण भिंतीसाठी निधी देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते नारायण आरू यांनी ६ तालुका प्रशासनाकडे केली.