पोहरादेवीत उद्धव ठाकरे जगदंबादेवी चरणी नतमस्तक!

By संतोष वानखडे | Updated: July 9, 2023 15:48 IST2023-07-09T15:48:12+5:302023-07-09T15:48:53+5:30

पोहरादेवी गडावर उद्धव ठाकरेंनी देवीची आरती केली.

poharadevi uddhav thackeray bows down at the feet of jagdamba devi | पोहरादेवीत उद्धव ठाकरे जगदंबादेवी चरणी नतमस्तक!

पोहरादेवीत उद्धव ठाकरे जगदंबादेवी चरणी नतमस्तक!

संतोष वानखडे, वाशिम  : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मानोरा तालुक्यातील श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे जगदंबादेवी चरणी नतमस्तक होत विदर्भातील झंझावात दौऱ्याचा शुभारंभ ९ जुलै रोजी दुपारी ३: १५ वाजतादरम्यान केला.

यावेळी,  ठाकरेंनी जगदंबादेवी, जगद्गुरू संत सेवालाल महाराज, राष्ट्रीय संत डॉ रामराव महाराज व बाबनलाल महाराज समाधी स्थळी  दर्शन घेतले. पोहरादेवी गडावर उद्धव ठाकरेंनी देवीची आरती केली. यावेळी ठाकरेंचा देवी सेवालाल ट्रस्ट कबीरदास महाराज, बापू समाधी स्थळी शेखर महाराज यांनी, बापू आश्रमात  बंजारा धर्मगुरू बाबुसिंग महाराज व बाबनलाल महाराज संस्थानच्या वतीने सुनील महाराज यांनी सत्कार केला. ठाकरे यांना पाहण्यासाठी तरुणाईने मोठी गर्दी केली होती. त्यांचे समवेत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेता अंबादास दानवे, खासदार विनायक राऊत, पश्चिम विदर्भ प्रमुख खा अरविंद सावंत, जिल्हा संपर्क प्रमुख दिलीप जाधव, आमदार नितीन देशमुख, जिल्हा प्रमुख डॉ सुधीर कव्हर, जिल्हा समन्वयक सुरेश मापारी, माजी वीज मंडळ सदस्य अनिल राठोड, माजी राज्यमंत्री संजय देशमुख, सेवा निवृत्त जिल्हान्यायधिस किशोर राठोड, राजू नाईक, आदी उपस्थित होते.

पारंपारीक पद्धतीने सत्कार !

सेवालाल महाराज मंदिरात कबीरदास महाराज यांनी पारंपारिक पद्धतीने बंजारा कवल पट्टा फेटा चांदीचा कडा टाकून उद्धव ठाकरे यांचा सत्कार केला.

Web Title: poharadevi uddhav thackeray bows down at the feet of jagdamba devi