जागतीक पर्यावरण दिनानिमित्त वृक्ष संवर्धनासाठी शपथ
By Admin | Updated: June 5, 2017 19:23 IST2017-06-05T19:01:45+5:302017-06-05T19:23:05+5:30
वाशीम: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सावली प्रतिष्ठान या निसर्ग व्यासंगी गृप च्या वतीने आगामी काळात पर्यावरण संवर्धनासाठी शपथ घेण्यात आली.

जागतीक पर्यावरण दिनानिमित्त वृक्ष संवर्धनासाठी शपथ
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशीम: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सावली प्रतिष्ठान या निसर्ग व्यासंगी गृप च्या वतीने आगामी काळात पर्यावरण संवर्धनासाठी शपथ घेण्यात आली. दीवसेदीवस होत असलेल्या वृक्ष तोडीमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. या सर्व गंभीर समस्यावर वृक्षारोपण हाच एक पर्याय असुन आगामी काळात विविध पर्यावरण पुरक उपक्रम राबविन्यासाठी पुन्हा एकदा टीम सावली सज्ज झाली आहे. यासाठी सावली प्रतिष्ठानचे अध्यक्ष राम धनगर यांनी दिली. सीड बॉल उपक्रमात बंडु गव्हाणे, रोहिदास धनगर, ऋषिकेश बाभने, प्रिया मोरे,वैशाली हांबरे , रेश्मी मोहटे , निखिल मोहटे , रुपेश काबरा , वैभव गौरकर प्रवीण होनमने , रुशाली बाभणे ,संगीता धनगर ,अजय यादव रुपाली धनगर,विकेश डोंगरे , सुनील हेंद्रे हे विशेष परीश्रम घेत आहेत.