श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण

By Admin | Updated: July 4, 2017 02:20 IST2017-07-04T02:20:50+5:302017-07-04T02:20:50+5:30

सवड: रिसोड तालुक्यातील सवड येथे स्वातंत्र्य सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबुजी यांच्या जयंतीनिमित्त २ जुलै रोजी वृक्षारोपण करण्यात आले.

Plantation for the birth anniversary of Jawaharlalji Darda of revered Jawaharlalji | श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण

श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण

लोकमत न्यूज नेटवर्क
सवड: रिसोड तालुक्यातील सवड येथे स्वातंत्र्य सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबुजी यांच्या जयंतीनिमित्त २ जुलै रोजी वृक्षारोपण करण्यात आले.
बाबुजी यांच्या ९४ व्या जयंतीचे औचित्य साधून येथील सिध्देश्वर विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन २ जुलैला करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान दोन्ही शाळेत प्रत्येकी १० वृक्ष लावण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी येथील सिध्देश्वर विद्यालयाचे संस्थापक अध्यख बबनराव गाडे हे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये सरपंच प्रकाशराव मस्के , जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक संतोष सपकाळ, पोलिस पाटील रमेशराव लाटे, विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही.एस. सावसुंदर, माजी सरपंच प्रभाकर पंडीत, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोषराव लाटे, वैजनाथ मगर बहुद्देशीय संस्थेचे संचालक अमोल मगर, तसेच गजानन गाडे यांची उपस्थिती होती. यावेळी उपस्थित मान्यवरांनी बाबुजी यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

Web Title: Plantation for the birth anniversary of Jawaharlalji Darda of revered Jawaharlalji