शिरपूरला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन लिकेज

By Admin | Updated: July 21, 2014 23:10 IST2014-07-21T23:10:53+5:302014-07-21T23:10:53+5:30

पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन लिकेज झाल्याने हजारो लिटर पाणी वाया जात असून संबधितांचे याकडे साफ दुर्लक्ष दिसून येत आहे.

Pipeline Liquidators supply water to Shirapur | शिरपूरला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन लिकेज

शिरपूरला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन लिकेज

शिरपूरजैन : गावाला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन लिकेज झाल्याने हजारो लिटर पाणी वाया जात असून संबधितांचे याकडे साफ दुर्लक्ष दिसून येत आहे. या संदर्भात स्थापत्य अभियंता यांनी ग्रामपंचायतला कळवून सुध्दा दुरूस्ती करण्याचे सांगितल्यावरही याकडे दुर्लक्ष केल्या जात आहे. बोराळा येथील अडोळ प्रकल्पातून रिसोड शहरासह शिरपूर जैन गावालपा पाण्याचा पुरवठा करण्यात येत असतो. या प्रकल्पातून शिरपूर ग्राम पंचायतच्या नळ योजनेसाठी पाईप लाईनव्दारे जलकुंभात पाणी साठवणूक केली जाते.मागील आठ दिवसांपासून प्रकल्पातून जलकुंभाकडे पाणी आणणरी मुख्य पाईप लाईन लिक होवून हजारो लिटर पाणी नाल्यातून वाहून जात आहे. यावर्षी अद्यापही योग्य त्या प्रमाणात पाऊस पडत नसल्याने प्रकल्पातील जलसाठयात कुठलीही वाढ झाली नाही. या बाबत लघुपाटबंधारे विभागाने शिरपूर ग्रामपंचायतला प्रत्यक्ष भेट देवून पाईप लाईन दुरूस्ती करण्याची सूचना दिलेली आहे परंतु ग्रामपंचायतने याकडे पुरते दुर्लक्ष केल्याने अजुनही लिकेट पाईप लाईन दुरूस्ती न केल्याने हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. तरी वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

Web Title: Pipeline Liquidators supply water to Shirapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.