विहिरीत आढळले महिलेचे प्रेत

By Admin | Updated: May 3, 2015 02:16 IST2015-05-03T02:16:39+5:302015-05-03T02:16:39+5:30

मानोरा तालुक्यातील घटना.

Phantom of the woman found in the well | विहिरीत आढळले महिलेचे प्रेत

विहिरीत आढळले महिलेचे प्रेत

मानोरा : तालुक्यातील मौजे सोमठाणा येथील महिला वर्षा किशोर ठाकरे (वय ३४) यांचे प्रेत शेतशिवारातील विहिरीत सा पडल्याने एकच खळबळ उडाली. पोलीस पाटील राजेंद्र भीमराव ठाकरे यांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून कलम १७४ आरपीसीनुसार र्मग दाखल करण्यात आला. मानोरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्‍या मौजे सोमठाणा येथील महिला वर्षा किशोर ठाकरे ही तीन दिवसांपूर्वी घरून निघून गेली होती. नातेवाईक व घरच्या मंडळीने तिचा शोधाशोध घेतला असता ती मिळून आली नाही. २ मे रोजी सकाळी ७ वाजताच्या दरम्यान फिर्यादी राजेंद्र ठाकरे हा घरी जात असताना गावातील गजानन कोल्हे यांनी त्यांना सांगितले की, गावालगत असणार्‍या सोमठाणा शिवारात असलेल्या पाणीपुरवठा विहिरीत एका महिलेचे प्रेत तरंगत आहे. तेव्हा तेथे जाऊन पाहिले असता सदर मृतदेहाची ओळख पटली. पोलीस पाटील राजेंद्र ठाकरे यांनी पोलीस स्टेशन गाठून याबाबत फिर्याद दिली. ठाकरे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी कलम १७४ सीआरपीसी अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सदर प्रेताचे शवविच्छेदन करण्यात आले असून, शवविच्छेदनाचा रिपोर्ट आल्यावर महिलेचा मृत्यू कशाने झाला हे समजू शकेल. मृतक महिलेच्या भावानेही पोलिसात तक्रार दिली असून, वृत्त लिहिस्तोवर कोणत्याच प्रकारचा गुन्हा दाखल झाला नव्हता. पुढील तपास ठाणेदार दोनकलवार व पोलीस करीत आहे.

Web Title: Phantom of the woman found in the well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.