महामार्गाचे काम सुरू करण्यासाठी जनआंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:54 IST2021-06-16T04:54:26+5:302021-06-16T04:54:26+5:30
यावेळी वनिता सिद्धार्थ देवरे, वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष रवींद्र देशमुख, महासचिव सिद्धार्थ देवरे, जिल्हा उपाध्यक्ष विनोद भगत ...

महामार्गाचे काम सुरू करण्यासाठी जनआंदोलन
यावेळी वनिता सिद्धार्थ देवरे, वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष रवींद्र देशमुख, महासचिव सिद्धार्थ देवरे, जिल्हा उपाध्यक्ष विनोद भगत व जिल्हा संघटक संतोष लांभाडे या जनआंदोलनास पाठिंबा देण्याकरिता जि.प. सदस्य दौलत इंगोले तथा पांडुरंग कोठाळे तसेच हिरंगी, लाठी, शेलूबाजार, तपोवन, तऱ्हाळा ग्रा.पं. सरपंच, उपसरपंच, सदस्यगण यांनी उपस्थित राहून पाठिंबा दर्शविला. राष्ट्रीय राजमहामार्ग औरंगाबाद विभागीय संचालक अरविंद काळे यांनी बंद असलेल्या मार्गाचे काम येत्या पाच दिवसात पोलीस बंदोबस्तात सुरू करण्याचे लेखी स्वरूपात आश्वासन दिल्यानंतर जनआंदोलन मागे घेण्यात आले. जनआंदोलनास वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष गजानन इंगोले, समाधान भगत, चंद्रकांत येवले, सहदेवराव चक्रनारायण, संतोष सावके, गजानन सुर्वे, विक्की महल्ले, दिलीप भगत, रवी सावध, दिवाकर चक्रनारायण, विनोद चुंबळे, बंडूभाऊ चक्रनारायण, प्रकाश चक्रनारायण आदी बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.