शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा लाॅकडाऊन ‘नकाे रे बाबा’ ; वाटल्यास नियम कडक करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 16:31 IST

Coronavirus Lockdown News आता पुन्हा लाॅकडाऊन नकाेरे बाबा.. अशी प्रतिक्रीया व्यक्त केली जात आहे.

 लाेकमत न्यूज नेटवर्कवाशिम : दिवाळीनंतर कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊनचे संकेत मिळत आहेत. परंतु विविध क्षेत्रातील मान्यवरांशी , संघटनेशी चर्चा केली असता आता पुन्हा लाॅकडाऊन नकाेरे बाबा.. अशी प्रतिक्रीया व्यक्त केली जात आहे. आधिच लाॅकडाऊनकाळात माेठे नुकसान झाले आता पुन्हा नकाे, यापेक्षा नागरिकांनी खबरदारी घ्यावी , वाटल्यास आणखी नियम कडक करावे पण लाॅकडाऊन नकाे असे नागरिकांचे मत आहे.लाॅकडाऊन काळात माेठया प्रमाणात उदयाेग व्यवसाय ठप्प पडले, पयार्यी मजुरांवरही उपासमार आली. शासनाने लाॅकडाऊन उठविल्यानंतर व्यवसाय सुरु झालेत, अघापही पूर्णपणे व्यवसाय सुरळीत झाले नसले तरी हळूहळू व्यवस्थित हाेत आहेत.  लाॅकडाऊन हटविण्यास काहीच काळ झाला नाही, आणि पुन्हा लाॅकडाऊन केल्यास अनेक व्यवसायाचे नुकसान हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही दिवसाआधी जिल्हयातील अनेक कामगार, मजूर, विविध कंपन्यांमध्ये काम करणारे आपआपल्या कार्यक्षेत्रात गेलेत.  त्यांना पुन्हा परतावे लागेल.

लाॅकडाऊनमुळे आधिच चरितार्थ चालविणे कठीण झाले हाेते. आता कसेबसे ऑटाेरिक्षा काही अटी शर्तींवर सुरु आहेत. लाॅकडाऊन न करता नियमांचे सर्वांना पालन करणे बंधनकारक करावे.- वसीम सय्यदऑटाे संघटना

लाॅकडाऊमुळे व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाले. आताही व्यवसाय पाहिजे त्या प्रमाणात सुरळीत झाले नाहीत. परंतु हळूहळू पूर्वपदावर येत आहेत. त्यात पुन्हा लाॅकडाऊन लागल्यास व्यापाऱ्याचे माेठे नुकसान हाेईल.- गाेविंद वर्मा, युवा व्यापारी संघटना

लाॅकडाऊन केल्यापेक्षा नियम कडक करुन लाॅकडाऊन हाेण्यापासून टाळावे. नागरिकांनीही शासनाच्या, प्रशासन नियमांचे पालन करुन काेराेना संसर्ग राेखण्यास प्रयत्न करावा , परंतु पुन्हा लाॅकडाउन नकाे. - जुगलकिशाेर काेठारी, व्यापारी संघटना

शासनाच्यावतिने देण्यात येणाऱ्या मार्गदर्शक सूचनानुसार काय करावयास पाहिजे व काय करु नये याबाबत नागरिकांना अवगत केल्या जात आहे. ३१ डिसेंबरपर्यंत काही नियमांचे पालन करण्याच्या सूचना जनतेला दिल्याच आहेत. यापुढेही शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार हाेईल. -षण्मुगराजन एस. जिल्हाधिकारी

टॅग्स :washimवाशिमCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक