२९४ वाहनावर दंडात्मक कारवाई

By Admin | Updated: August 12, 2014 23:23 IST2014-08-12T23:23:07+5:302014-08-12T23:23:07+5:30

पोलिसांची धडक मोहिम

Penal action on vehicle 294 | २९४ वाहनावर दंडात्मक कारवाई

२९४ वाहनावर दंडात्मक कारवाई

मंगरूळपीर: मागील एक महिन्याच्या कालावधीत अवैध प्रवाशी वाहतूकीसह इतर २९४ वाहनावर पोलीसांनी दंडात्मक कारवाई केली. परिणामी अवैध वाहतुक तथा शिस्त मोडणार्‍या मोटारसायकल वाहनधारकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगरूळपीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेशिस्त झालेल्या वाहनाला लगाम घालण्यासाठी गत जुलै महिण्यात रूजू झालेले ठाणेदार अब्दुल रऊफ शेख यांनी धडक कारवाईची मोहिम हाती घेतली आहे. पीएसआय सुर्यकांत पारटकर, वैभव पराते व वाहतूक शिपायांच्या मदतीने कारवाईला सुरूवात केली आहे. एका महिन्यात अवैध प्रवाशी वाहतूक करणार्‍या ३0 वाहनांवर कारवाई केली. या बरोबरच तिब्बल सिट प्रवास करणार्‍या ६१ मोटार सायकल, रहदारीस अडथळा निर्माण करणार्‍या ३८ तर वाहन परवाना सोबत न बाळगणे,विना नंबरप्लेट अशा विविध १६५ वाहनावर कारवाई करण्यात आली. एका महिण्यात २९४ वाहनावर करण्यात आली असून सदर धडक मोहिम सुरूच राहणार असल्याची माहीती पोलीसांनी दिली.या कारवाईमुळे कायदा मोडणार्‍यांनी चांगलीच धास्ती घेतल्याचे चित्र पहावयास मिळत आहे

Web Title: Penal action on vehicle 294

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.