जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांचे वेतन द्या पहिल्याच तारखेला : ग्रामविकास विभागाचे निर्देश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2018 02:03 PM2018-10-07T14:03:39+5:302018-10-07T14:05:08+5:30

ग्रामविकास विभागाच्या उपसचिवांनी सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य लेखा व वित्त अधिकाºयांना ५ आॅक्टोबर रोजी पत्र पाठवून दर महिन्याच्या पहिल्याच तारखेला वेतन अदा करण्याचे आदेश दिले आहेत.

 Payments of Zilla Parishad employees on the first date: Directives of Rural Development Department | जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांचे वेतन द्या पहिल्याच तारखेला : ग्रामविकास विभागाचे निर्देश 

जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांचे वेतन द्या पहिल्याच तारखेला : ग्रामविकास विभागाचे निर्देश 

Next
ठळक मुद्देकर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचाºयांना वेतन मिळण्यास विलंब होत असल्याच्या तक्रारी शासनाकडे करण्यात आल्या आहेत. ५ आॅक्टोबर रोजी पत्र पाठवून दर महिन्याच्या पहिल्याच तारखेला वेतन अदा करण्याचे आदेश दिले आहेत.


लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्हा परिषदेचे कर्मचारी व सेवा निवृत्त कर्मचारी यांचे वेतन दर महिन्याच्या १ तारखेला करण्याचे निर्देश ४ जून २०११ च्या शासन निणर्याव्दारे सर्व संबंधितांना देण्यात आले आहेत. तथापि अद्यापही जिल्हा परिषद कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचाºयांना वेतन मिळण्यास विलंब होत असल्याच्या तक्रारी शासनाकडे करण्यात आल्या आहेत. या पृष्ठभूमीवर ग्रामविकास विभागाच्या उपसचिवांनी सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य लेखा व वित्त अधिकाºयांना ५ आॅक्टोबर रोजी पत्र पाठवून दर महिन्याच्या पहिल्याच तारखेला वेतन अदा करण्याचे आदेश दिले आहेत.
जिल्हा परिषदेचे कर्मचारी व सेवा निवृत्त कर्मचारी यांचे वेतन दर महिन्याच्या १ तारखेला करण्याचे निर्देश आहेत. यासाठी बीम्स प्रणालीवर अनुदान अप्राप्त असल्यास उणे प्राधिकार पत्र काढण्याची सोयही शासनाने बीम्स प्रणालीवर ऊपलब्ध केली, तसेच जिल्हा परिषदेच्या कोणत्याही कर्मचाºयाचे वेतन अनुदानाअभावी थांबवू नये, अशा सुचनाही ग्रामविकास विभागाच्यावतीने ३१ जुलै २०१५ च्या परिपत्रकानुसार सर्व जिल्हा परिषदांना दिल्या आहेत. तथापि, अद्यापही जिल्हा परिषद कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचाºयांना वेतन मिळण्यास विलंब होत आहे. या संदर्भात ग्रामविकास मंत्र्यांकडे तक्रारही प्राप्त झाल्या आहेत. या पृष्ठभूमीवर ग्रामविकास विभागाच्या उपसचिवांनी सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य लेखा व वित्त अधिकाºयांना ५ आॅक्टोबर रोजी पत्र पाठवून दर महिन्याच्या पहिल्याच तारखेला वेतन अदा करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या पुढे वेतनास विलंब झाल्याची तक्रार व्हायला नको असेही बजावले आहे.

Web Title:  Payments of Zilla Parishad employees on the first date: Directives of Rural Development Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.