शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
3
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
4
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
5
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
6
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
7
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
8
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
9
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
10
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
11
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
12
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
13
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
14
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
15
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
16
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
17
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
18
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
19
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
20
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

हताश शेतक-यांना समुपदेशनातून दिला जाणार धीर!

By admin | Updated: November 16, 2014 23:47 IST

आत्महत्या कमी करण्यासाठी अमरावती विभागातील पाचही जिल्हय़ात उपाययोजना.

संतोष येलकर/अकोलाशेतकरी आत्महत्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी, नैराश्याच्या गर्तेत असलेल्या शेतकर्‍यांना आता समुपदेशनातून मानसिक धीर देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. हा उपक्रम अमरावती विभागातील पाचही जिल्हय़ात शासनामार्फत लवकरच राबविण्यात येणार आहे.यावर्षीच्या पावसाळ्यात अल्प पाऊस झाल्याने, खरीप हंगामात मूग, उडिदाचे पीक शेतकर्‍यांच्या हातून गेले. सोयाबीन पिकाच्या उत्पादनातही प्रचंड घट झाली असून, शेतकरी हवालदिल झाला आहे. नापिकी आणि कर्जापायी विदर्भात शेतकरी आत्महत्यांच्या घटना घडत आहेत. या पृष्ठभूमीवर शेतकरी आत्महत्या कमी करण्यासाठी, नैराश्याच्या गर्तेत सापडलेल्या शेतकर्‍यांचा शोध घेऊन, त्यांना समुपदेशनाद्वारे मानसिक धीर देण्याची उपाययोजना अमरावती विभागातील अकोला, अमरावती, वाशिम, बुलडाणा व यवतमाळ या पाचही जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. कमी पीक उत्पादन झालेल्या आणि नैराश्याचे वातावरण असलेल्या गावांमध्ये शेतकर्‍यांचे समुपदेशन करण्यात येणार आहे. लोकमत प्रतिनिधीशी बोलताना अमरावती विभागाचे आयुक्त ज्ञानेश्‍वर राजूरकर यांनी शेतकरी आत्महत्या कमी करण्यासाठी, तसेच शेतकर्‍यांमधील नैराश्याचे वातावरण नाहिसे करण्याकरिता, अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात शेतकर्‍यांचे समुपदेशन करण्याचा उपक्रम लवकरच राबविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. *गाव पातळीवर होणार समुपदेशन!नैराश्यात सापडलेल्या शेतकर्‍यांचा शोध घेऊन, अमरावती विभागातील अमरावती, अकोला, वाशिम, बुलडाणा व यवतमाळ या पाचही जिल्ह्यातील गाव पातळीवर तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक, अंगणवाडीसेविका, आशा स्वयंसेविका, सरपंच, तंटामुक्ती समिती अध्यक्ष यांच्याकडून समुपदेशन करण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांना समुपदेशनाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.*असे होणार समुपदेशन!नैराश्याच्या गर्तेत सापडलेल्या शेतकर्‍यांच्या अडचणी समुपदेशनात समजून घेण्यात येणार आहेत. अडचणींवर मात करून, त्या सोडविण्याच्या विषयांवर त्यांच्याशी चर्चा केली जाणार आहे. अडचणींमुळे येणारी नैराश्याची भावना कमी करून, त्यांना मानसिक आधार देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.