पतंजली सेवा ट्रस्ट आता शेतक-यांसोबत कार्य करणार - डॉ. जयदीप आर्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 19:22 IST2018-01-28T19:22:26+5:302018-01-28T19:22:37+5:30
वाशिम: शेतकरी हा देशाचा आत्मा असून भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळेच पतंजली केवळ भुलथापा न मारता शेतक-यांना खºयाअर्थाने त्यांच्या पायावर उभे करण्याचे कार्य करत आहे. शेतकºयांसोबत गोमातेवर आधारीत कृषी प्रक्रिया देशात उभारुन शेतकºयांसोबत प्रत्यक्ष कार्य करणार असल्याचे प्रतिपादन पतंजली योगपिठाचे केंद्रीय प्रभारी डॉ. जयदीप आर्य यांनी येथे केले.

पतंजली सेवा ट्रस्ट आता शेतक-यांसोबत कार्य करणार - डॉ. जयदीप आर्य
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: शेतकरी हा देशाचा आत्मा असून भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळेच पतंजली केवळ भुलथापा न मारता शेतक-यांना खºयाअर्थाने त्यांच्या पायावर उभे करण्याचे कार्य करत आहे. शेतकºयांसोबत गोमातेवर आधारीत कृषी प्रक्रिया देशात उभारुन शेतकºयांसोबत प्रत्यक्ष कार्य करणार असल्याचे प्रतिपादन पतंजली योगपिठाचे केंद्रीय प्रभारी डॉ. जयदीप आर्य यांनी येथे केले.
स्थानिक पाटणी कमर्शियल कॉम्प्लेक्समध्ये २७ जानेवारीला सायंकाळी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. डॉ. आर्य पुढे म्हणाले की, वाशीम येथे प्रथमच योगऋषी स्वामी रामदेवबाबा यांचे आगमन होत असून २७, २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी सकाळी ५ ते ७.३० या कालावधीत योग शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबीरात तीन दिवसात किमान तीन किलो वजन कमी होणे, डायबिटीसच्या रुग्णांना लाभ मिळणे, ज्यांना नुकतेच डायबिटीस झाला, त्यांचा हा आजार पुर्णपणे बरा होणे, अस्थमा, तणाव, हातपाय, कंबर, घुटना दर्द असणाºया रुग्णांना शिबीरातून लाभ मिळणार आहे.
सदर शिबीराचा मुख्य उद्देश लोकांच्या जीवनात सुख आणणे हा असून सदर कार्यक्रमामध्ये स्वामी रामदेव हे महिलांसाठी विशेष मार्गदर्शन करतील. कारंजा लाड येथे भव्य शेतकरी संमेलन तसेच युवकांसाठी विशेष शिबीरात मार्गदर्शन करण्यात येईल. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही संपूर्ण विश्वात योग वाढविण्यासाठी पुढाकार घेतला असून ही देशासाठी मोठी उपलब्धी आहे, असे त्यांनी सांगितले.