एसटी बसमध्ये प्रवासी मास्कविनाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:44 IST2021-09-26T04:44:49+5:302021-09-26T04:44:49+5:30

त्यामुळे मजुरांना मिळेना काम वाशिम : रिसोड तालुक्यातील महसूल विभागात अनेक महत्त्वाची पदे रिक्त असून त्याचा थेट ...

Passengers in ST buses without masks | एसटी बसमध्ये प्रवासी मास्कविनाच

एसटी बसमध्ये प्रवासी मास्कविनाच

त्यामुळे मजुरांना मिळेना काम

वाशिम : रिसोड तालुक्यातील महसूल विभागात अनेक महत्त्वाची पदे रिक्त असून त्याचा थेट परिणाम मनरेगाच्या कामांवर झाला असून ही कामे गत काही महिन्यांपासून ठप्प झाली आहेत. यामुळे गोरगरीब कुटुंबातील मजुरांच्याही हाताला काम मिळेनासे झाले आहे. वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची मागणी हाेत आहे.

राष्ट्रीय महामार्गाचे काम संथगतीने

वाशिम : वाशिम ते मालेगाव यादरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गाचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. अमानीनजीक (ता. मालेगाव) पुलाचे काम अद्याप अपूर्ण असून काही ठिकाणी रस्त्यावर गिट्टी, रेती पडून राहत आहे. यामुळे वाहनचालकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

ट्रिपल सीट वाहनचालकांवर कारवाई

वाशिम : शेलूबाजारकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शनिवारी दुपारच्या सुमारास प्रामुख्याने ट्रिपल सीट वाहतूक करणाऱ्या दुचाकी वाहनांवर कारवाई केली. संबंधितांकडून दंड वसूल करण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून कारवायांमध्ये सातत्य राखले जात असून त्याचा अपेक्षित फायदा होत असल्याचे दिसून येत आहे.

पोषण आहार जनजागृती कार्यक्रम

वाशिम : इंझोरी येथील अंगणवाडी केंद्रात महिला बचतगट व अंगणवाडी सेविका यांनी राष्ट्रीय पोषण माह कार्यक्रमांतर्गत शुक्रवारी अंगणवाडी केंद्रात स्तनदा माता व बालकांसाठी पोषण आहार मार्गदर्शन कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमासाठी अंगणवाडी सेविका पूजा भवाने, सुनंदा इंगोले, शोभा भदाडे आदी महिलांनी सहकार्य केले.

राष्ट्रीय महामार्ग बनलेत ‘वाहनतळ’

वाशिम : मंगरुळपीर शहरात नवनिर्मित राष्ट्रीय महामार्गावर वाटेल तेथे वाहने उभी केली जात आहेत. रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनांचे चालक आणि पादचाऱ्यांना याचा मोठा त्रास होत असून, या प्रकारामुळे अपघाताची भीती निर्माण झाली असतानाही प्रशासनाकडून याची दखल घेऊन कारवाई केली जात नाही. त्यामुळे नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे.

कायदेविषयक शिबिराला प्रतिसाद

वाशिम : मेडशी ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराला ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद लाभला.

Web Title: Passengers in ST buses without masks