वाशिम : जिल्ह्यातील शेकडो गावांमध्ये यंदा भीषण पाणीटंचाई निर्माण झालेली असताना प्रशासकीय पातळीवरून पाणीटंचाई निवारणार्थ आखलेल्या कृती आराखड्यानुसार उपाययोजनांची अंमलबजावणी अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे. ...
वाशिम - एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गतचा लाभ बंद होऊ नये ्म्हणून बालकांची आधार नोंदणी केली जात आहे. दरम्यान, जिल्ह्यात आधार नोंदणी केंद्रांची कमतरता असल्याने लाभार्थी बालक, मातांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. ...
कारंजा : कारंजा तालुक्यातील यावर्डी येथील बाबासाहेब धाबेकर विद्यालयात आदिशक्ती महिला बहुद्देशीय संस्था वाल्हई तर्फे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुस्तक पेढी योजनेअंतर्गत दहावीच्या ३० होतकरू विद्यार्थ्यांना बुधवारी मोफत पाठ्यपुस्तकाच्या संचांचे वित ...
वाशिम : तत्कालिन शिक्षणाधिकारी यांनी कामात अनियमितता केल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांच्यासंदर्भात विभागीय चौकशीचा प्रस्ताव उपसंचालक अमरावती यांना पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेतील सुत्रांकडून प्राप्त झाली. ...
वाशिम : आपल्या विविध प्रलंबित मागण्यांच्या पुर्ततेसाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांनी ११ एप्रिलपासून संप पुकारत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. यामुळे ग्रामीण भागातील आरोग्यविषयक सुविधांचा पुरता फज्जा उडाला आहे. ...
वाशिम : शहरात अक्षयतृतिया निमित्ताने आपल्या पुर्वजांचे स्मरण करण्याचा प्रघात आहे. हेच औचित्य साधून ज्यांनी देशासाठी महान कार्य केले असे आपलेच पूर्वज अर्थात महापुरुषांच्या पुतळ्याजवळ जावून त्याची स्वच्छता , अभिसिंचन आणि पूजन करण्यात आले. ...